Tuesday, May 4, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र धक्कादायक! जोरदार वादळाने पाळणा हवेत उडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

धक्कादायक! जोरदार वादळाने पाळणा हवेत उडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Related Story

- Advertisement -

यवतमाळमधील आर्णी तालुक्यातील लोणी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने आणि जोरदार वादळाने घराचे छत उडाले. छताच्या लोखंडी रॉडला बांधलेला पाळणाही वादळामुळे हवेत उडाला. यामध्ये चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाल्याचा प्रकार घडला. छताच्या लोखंडी रॉडला बांधलेल्या पाळण्यात एका दीड वर्षाच्या चिमुकल्याचा जमिनीवर कोसळल्याने मृत्यू झाला. मंथन सुनील राऊत असे या चिमुकल्याचे नाव आहे.

असा घडला प्रकार

आर्णी तालुक्यातील लोणी गावात शनिवारी दुपारी गावात जोरदार वादळ सुरू झाले. त्यावेळी चिमुकला पाळण्यात झोपला होता. या चिमुकल्याकडे त्याची बहिण दिव्या लक्ष देत होती. आई अरुणा दुसऱ्या खोलीत कामं करत होती. मात्र अचानक झालेल्या जोरदार वादळाने खोलीतील छताचे पत्रे उडाले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, छताच्या लोखंडी रॉडला बांधलेला पाळणा वादळामुळे हवेत उडाला. हे पाहून घाबरलेल्या बहिणीने ओरडत आईकडे धाव घेतली. त्यांच्या ओरडण्याने शेजारी देखील मदतीला धावून आले. वादळाने आजूबाजूचे काहीच दिसेनासे झाले होते. आई वादळात चिमुकल्याचा शोध असताना घराच्या काही अंतरावर काही पत्रे पडलेले दिसले. जमिनीवर कोसळल्यामुळे चिमुकल्या मंथनचा मृतदेह दिसताच आईच्या काळजात धस्स झाले आणि आई बहिण जीवाच्या आकांताने रडू लागले.

- Advertisement -