घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये सॅनिटायझरचा भडका; महिलेचा मृत्यू

नाशिकमध्ये सॅनिटायझरचा भडका; महिलेचा मृत्यू

Subscribe

कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरात सॅनिटायझर फवारणी करत असताना त्याने पेट घेतल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मेहबूब नगर, वडाळागावात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. रजबीया शाहिद शेख (रा. मेहबुबनगर, वडाळागाव) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रजबीया शेख यांच्या घरात २० जुलै रोजी रात्री वीज गेली होती. त्यामुळे त्यांनी मेणबत्ती पेटवली होती. कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्या घरात सॅनिटायझर फवारणी करत होत्या. त्यावेळी अचानक सॅनिटायझरने पेट घेतला. यामध्ये त्या ९० टक्के भाजल्या. ही बाब नातलग व नागरिकांना समजताच उपचारार्थ त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले. रूग्णालयात उपचारदरम्यन शुक्रवारी (दि.२४) त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस हवालदार राणे करत आहेत.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -