घरCORONA UPDATEदुकाने, बाजारपेठा उद्यापासून सुरू; कन्टेनमेंट झोन वगळता अन्यत्र मोकळीक

दुकाने, बाजारपेठा उद्यापासून सुरू; कन्टेनमेंट झोन वगळता अन्यत्र मोकळीक

Subscribe

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे मुंबई, पुणे परिसरात जवळपास अडीच महिन्यापासून बंद असलेली दुकाने, बाजारपेठा आजपासून खुल्या होत आहेत. राज्य सरकारने प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित भागात दैनंदिन व्यवहार सुरू करण्यास सशर्त परवानगी दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारने ३१ मे रोजी पाचव्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. पाचवा लॉकडाऊन ३० जूनपर्यंत असला तरी सरकारने मुंबई आणि पुणे महानगर प्रदेश तसेच राज्यात रेड झोनमध्ये राहिलेल्या अनेक महापालिका क्षेत्रात निर्बंध शिथिल केले आहेत. परिणामी येथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.

- Advertisement -

सरकारने ३ जूनपासून मिशन बिगिन अगेन सुरू केले होते. मात्र, निसर्ग चक्रीवादळामुळे लोकांना दोन दिवस घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला होता. चक्रीवादळाचे संकट टळल्याने आता उद्यापासून (शुक्रवार) लोकांना बाहेर पडता येणार आहे. पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत लोकांना आपली दिनचर्या करता येईल. या दरम्यान रात्री ९ ते पहाटे ५ अशी संचारबंदी राहणार आहे.

उद्यापासून परवानगी

उद्यानात जाता येणार. जॉगिंग, सायकल चालवणे, धावणे, शतपावली, व्यायाम करता येणार. मात्र कोणत्याही ग्रुप अॅक्टिव्हिटीला परवानगी नाही.

- Advertisement -

नागरिकांना जवळपास प्रवास करण्यास परवानगी. मात्र, लांब प्रवास करण्यास मनाई. तसेच खुल्या मैदानात गर्दी करता येणार नाही.

प्लांबर, इलेक्टरीशन, पेस्ट कंट्रोल, तंत्रज्ञ आदींना मास्क वापरून शारीरिक अंतर पाळून काम करण्यास मुभा

गॅरेज, वर्कशॉप सुरू होणार

बाजारपेठ, दुकाने (मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स वगळून) सम, विषम तारखेला कामाच्या वेळेत सुरू राहणार

कपड्याच्या दुकानात ट्रायल रूमला परवानगी नाही

प्रवासासाठी परवानगी

टॅक्सी, कॅब            : १ अधिक २ प्रवाशी
रिक्षा                   : १ अधिक २ प्रवाशी
चारचाकी वाहन       : १ अधिक २
दुचाकीवर फक्त चालकास परवानगी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -