लातूर: विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील शिशू अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किट

Short circuit Vilasrao Deshmukh Medical College in latur
लातूर: विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील शिशू अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किट

लातूरमधील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील शिशू अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किट झाल्याचे समोर आले आहे. येथील नवजात बालकांना तातडीने सुरक्षास्थळी हलवण्यात आले आहे.

माहितीनुसार आज, गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील शिशू अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किट झाला. यामुळे संपूर्ण विभागात धूर पसरला होता. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने तिथला विद्युत पुरवठा खंडीत केला. तसेच विभागातील नवजात बालकांना तात्काळ सुरक्षास्थळी हलवण्यात आले. प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहेत.

या घटनेमुळे विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील शिशू अतिदक्षता विभागात असलेल्या नवजात बालकांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पण प्रशासनाने नवजात बालक सुरक्षित असल्याचे सांगितले असून शॉर्ट सर्किट झाला आहे. कोणताही आग लागली नाही. सध्या नवजात बालकांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. या निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.


हेही वाचा – Vitthal Rukmini Darshan : जेष्ठ नागरिक, गर्भवती महिलांनाही मिळणार पंढपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरात प्रवेश