महारेराने विकासकांच्या २६१ प्रकल्पांना बजावल्या कारणे दाखवा नोटिसा

डिसेंबरपर्यंत घरांचा ताबा देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात 40% पेक्षा कमी काम झालेल्या आणि सुमारे 25 ते 500 कोटी रूपयांच्या गुंतवणुकीच्या 261 प्रकल्पांची महारेराने झाडाझडती सुरू केली आहे. तर विकासकांना महारेराकडून कारणे दाखवा नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत.

Maharera will take action against builders who do not provide basic information about project to customers

डिसेंबरपर्यंत घरांचा ताबा देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात 40% पेक्षा कमी काम झालेल्या आणि सुमारे 25 ते 500 कोटी रूपयांच्या गुंतवणुकीच्या 261 प्रकल्पांची महारेराने झाडाझडती सुरू केली आहे. तर विकासकांना महारेराकडून कारणे दाखवा नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत.

डिसेंबर 2023 अखेर घरांचा ताबा देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात 40% पेक्षाही कमी काम झालेल्या 261 प्रकल्पांना महारेराने कारणे दाखवा नोटिसेस बजावल्या आहेत. 25 ते 500 कोटींच्या 45,539 सदनिकांच्या या प्रकल्पांत सुमारे 26,178 सदनिकांची नोंदणी झालेली आहे. विकासकांनी महारेराकडे सादर केलेल्या माहितीच्या आधारेच महारेराने ह्या नोटिसेस बजावलेल्या आहेत.

विकासक हे प्रकल्प येत्या 9 महिन्यात कसे पूर्ण करणार आहेत, हे साधार स्पष्ट करण्यासाठी महारेराने ह्या कारणे दाखवा नोटीसेस बजावल्या आहेत. ह्या नोटीसेस प्रकल्प नोंदणी करताना महारेराकडे दिलेल्या इमेल पत्त्यावर पाठविण्यात आलेल्या आहेत. या विकासकांना त्यांची बाजू स्पष्ट करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे.

स्थावर संपदा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या घर खरेदीदार आणि तत्सम गुंतवणूकदारांची गुंतवणूक सुरक्षित राहावी यासाठी महारेरा सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. त्यासाठीच महारेराने देशातील कुठल्याही प्राधिकरणात अस्तित्वात नसलेली ‘ प्रकल्प संनियंत्रण यंत्रणा ‘ ( Project Monitoring System)कार्यरत केली आहे. या यंत्रणेच्या मदतीने महारेराने नोंदणीकृत प्रकल्पांचे सूक्ष्म संनियंत्रण ( Close Monitoring)सुरू केलेले आहे. या अभ्यासातून वरील त्रुटी महारेराने शोधल्या आहेत.

या 40% पेक्षाही कमी काम झालेल्या प्रकल्पांत प्रत्यक्षात 53 प्रकल्पांत 10% पेक्षा कमी; 44 प्रकल्पांत 10 ते 20% ; 60 प्रकल्पात 20 ते 30% आणि 104 प्रकल्पात 30 ते 40% एवढेच काम झालेले आहे.

एवढेच नाही यात 25% खर्च झालेले 106 प्रकल्प आहेत. 25 ते 50 % खर्च झालेले 92 , 50 ते 75 % खर्च झालेले 47 आणि 75 ते 100 % खर्च झालेलेही 15 प्रकल्प आहेत. यातील एका प्रकल्पात 100% पेक्षा जास्त खर्च होऊनही प्रत्यक्षात काम मात्र 20 ते 30% झालेले आहे.

यात मुंबई शहर 26, मुंबई उपनगर 94 , पुणे 67, ठाणे 43 , रायगड 15, पालघर 6, नागपूर 3, नाशिक 2, सातारा, कोल्हापूर, अमरावती ,औरंगाबाद आणि दादरा नगर हवेली भागातील प्रत्येकी एका प्रकल्पाचा यात समावेश आहे.


हेही वाचा – देशात पुन्हा कोरोना फैलावतोय! मुंबईसह राज्यामध्ये एका दिवसात आढळले ‘एवढे’ रुग्ण