घरमहाराष्ट्रश्रीमंत दगडूशेठ हलवाई घेणार गाव 'दत्तक'

श्रीमंत दगडूशेठ हलवाई घेणार गाव ‘दत्तक’

Subscribe

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पूरग्रस्त गाव दत्तक घेणार आहेत.

सातारा, सांगली आणि कोल्हापूर पुरग्रस्त भागातील एक गाव दत्तक घेणार आहे, अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली आहे. ‘पुरस्थितीमुळे याभागातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व देवस्थानच्या ट्र्स्टने मदत करण्याचे आवाहन केले. त्यानुसार पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टही मदतीसाठी पुढाकार घेईल. मुख्यमंत्री यांनी या भागातील कोणतेही एक गाव निवडून ते कळविल्यास त्या गावाचे संपूर्ण पुर्नवसन करण्याचे काम केले जाईल‘, अशी माहिती गोडसे यांनी दिली आहे.


हेही वाचा – श्रीमंत दगडूशेठ हलवाईला १२६ किलोच्या मोदकाचा नैवेद्य!

- Advertisement -

सध्या सातारा, सांगली, कोल्हापूरमधील अनेक गावातील पूर स्थिती ओसरत आहे. येत्या काळात परिस्थिती पूर्वपदावर येईल. मात्र, पूरस्थितीमुळे बहुतांशी गावात नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना मदत करण्यासाठी सरकार, विविध मंडळे, राज्यातील विविध संस्था, नागरिक पुढाकार घेत आहे. त्यासोबत पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टही मदत करेल. त्यासाठी दरवर्षी ट्रस्ट तीन कोटी रूपये ठेवत असते. परंतु ही मदत निधी स्वरूपात देणार नसून गावाचे पुर्नवसनाच्या माध्यमातून करेल. त्यासाठी मुख्यमंत्री यांनी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत कोणतेही एक गाव निवडून ते कळवावे. या भागातील गावात पूरामुळे झालेले नुकसानीमध्ये रस्ते, शाळा, घरे, वीज, संसारपयोग वस्तू यांचे पुर्नवसन केले जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -