Thursday, February 25, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र कोरोनाचा उद्रेक: राज्यात पुन्हा 'देऊळ बंद'

कोरोनाचा उद्रेक: राज्यात पुन्हा ‘देऊळ बंद’

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पाहयला मिळत आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येतही भर पडत असल्याने राज्य सरकार पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आहे. राज्यातील अमरावती, नाशिक, अचलपुर, नागपुर. जळगाव, यमवतमाळ, धुळे जिल्ह्यातही नाईट कर्फ्यू आणि निर्बंध जाहीर झाले आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक ‘देऊळ बंद’ करण्याचा निर्णय अनेक देवस्थांनी घेतला आहे. याचपार्श्वभूमीवर शेगावचं गजानन महाराज मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे, त्यामुळे भाविकांना आता पुढील काही दिवस दर्शन बंद असणार आहे. (Shegaon Gajanan Maharaj Mandir Closed Over Corona Virus)

शेगावचं गजानन महाराज मंदिर बंद 

अमरावती विभागीय आयुक्त तसंच बुलडाणा जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने 21 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येईल. असे सांगण्यात आले आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करीत संस्थानने घेतला निर्णय संस्थान प्रशासनाला मान्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील एकादशी माघी यात्रा रद्द 
- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरचे विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिरही आज बंद राहणार आहे. तसेच यंदाची माघी यात्रीही रद्द केली असून उद्या माघी एकादशी असल्याने मंदिर आज आणि उध्या मंदिर राहणार बंद राहणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी दिली.

राज्यात ‘देऊळ बंद’

२०२० मध्ये कोरोना रुग्णांचा वाढत आकडा पाहता राज्यातील मंदिरे, धार्मिक कार्यक्रम १० महिने पूर्णपणे बंद करण्यात आले होते. मात्र कोरोनाचा वेग मंदावत असताना महाविकास आघाडी सरकारवर मंदिरे खुली करण्यासाठी विरोधकांकडून दबाव टाकला जात होता. तसेच धार्मिक संघटनांकडूनही मंदिरे खुली करण्याची मागणी जोर धरत होती. त्यानंतर राज्यात मंदिरे खुली झाली. मात्र मंदिरे खुली होऊन २ महिने उलटत नाही तोवर रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे, त्यामुळे राज्यातील देऊळ पुन्हा बंद होतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

याचपार्श्वभूमीर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी पुढील आठ दिवसात लोकांकडून योग्य प्रतिसाद आला नाही तर आठ दिवसानंतर लॉकडाऊन घोषित करणार असल्याचे सांगितले. तसेच राजकीय सभा, मेळावे, राजकीय मिरवणुका, सामाजिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक आणि धार्मिक स्वरुपाच्या मिरवणुका आणि यात्रा, जत्रांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात देवस्थाने पुन्हा एकदा बंद होतील अशा चर्चा सुरु आहेत. यावर आता राज्य सरकार काय निर्णय घेईल हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.


हेही वाचा- मंत्री छगन भुजबळांना कोरोनाची लागण

- Advertisement -