घरमहाराष्ट्रश्रीराम कथा सप्ताहाचे आयोजन

श्रीराम कथा सप्ताहाचे आयोजन

Subscribe

अहमदनगर येथे राधा-कृष्ण सेवा समितीच्या वतीने श्रीराम कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात भव्य शोभायात्रा देखील काढण्यात येणार आहे. मंगळवारपासून श्रीराम कथा सप्ताहाला सुरुवात होणार आहे.

अहमदनगर येथील राधा-कृष्ण सेवा समितीच्या वतीने मंगळवार २५ डिसेंबर पासून खाकीदास बाबा मठात सुरु होणार्‍या श्रीराम कथा सप्ताहाचे मांडव पुजन यजमानांच्या हस्ते करण्यात आले. मांडव पुजन करुन कार्यक्रमस्थळी भगवा ध्वज फडकविण्यात आला आहे. मांडव पुजन वृंदावनचे विवेक महाराज चोभे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले आहे.

भव्य शोभायात्रा

अहमदनगर येथे मंगळवार पासून सुरु होणार्‍या कथा सप्ताहनिमित्त लालटाकी येथून दुपारी १:३० वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभा यात्रेच्या समाप्ती नंतर श्रीराम कथा सप्ताहाला प्रारंभ होणार असून, या कथा सप्ताहात गौडिया वैष्ण वाचार्य युगल शरण महाराज आपल्या मधुर वाणीने कथेचे निरुपम करणार आहेत. तर रामायणाच्या कथेतील प्रसंगांचा उलगडा करुन भाविकांना त्याचा सार सांगणार आहेत. २ जानेवारी पर्यंत दररोज दुपारी ३ ते संध्याकाळी ७ या वेळेत ही कथा चालणार आहे. या सप्ताहामध्ये शिवविवाह, रामजन्म, राम विवाह, केवट, भरत आणि शबरी चरित्र तसेच सुंदरकांड आणि राजतिलक यावर युगल शरण महाराज मार्गदर्शन करणार आहेत. या कथा सप्ताहाला उपस्थित राहण्याचे आवाहन निर्मला मालपाणी, प्रदिप पंजाबी आणि कथेच्या ३१ यजमानांनी आवाहन केले आहे. कथा यशस्वी करण्यासाठी श्रीराम कथा ग्रुपचा देखील सहभाग आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -