Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र श्रीकर परदेशींची उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात बदली, पंतप्रधान कार्यालयामध्ये केले आहे काम

श्रीकर परदेशींची उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात बदली, पंतप्रधान कार्यालयामध्ये केले आहे काम

Subscribe

श्रीकर परदेशींची उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात बदली करण्यात आली आहे. श्रीकर परदेशी यांनी राज्यात विविध पदावर काम केले आहे.

पंतप्रधान कार्यालयातील कामकाजाचा अनुभव असलेले सनदी अधिकारी श्रीकर परदेशी यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.२००१ या तुकडीचे सनदी अधिकारी असलेले परदेशी हे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. २०१४ मध्ये केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर परदेशी हे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात रुजू झाले होते. आता ते उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव म्हणून राज्यात परतले आहेत.

भाऊसाहेब दांडगे कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तपदी –

- Advertisement -

दरम्यान, आज काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांडगे यांची कल्याण डोंबिवली महापलिकेच्या आयुक्तपदी तर मुख्याधिकारी अजीज शेख यांची उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रोचा अतिरिक्त कार्यभार –

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहाखातर मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे दिला आहे. याआधी शिंदे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या बांधकामावरील स्थगिती उठविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

मुंबई मेट्रोचा प्रकल्प पुढे रेटण्यासाठी मेट्रो महामंडळाची स्थापना २०१४ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात झाली होती.या महामंडळाचा कारभार हाकण्यासाठी फडणवीस यांनी अश्विनी भिडे यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती. भिडे यांनी मुंबई मेट्रोच्या कामाला वेग दिला होता. तरीही आरे येथील मुंबई मेट्रो कारशेडच्या कामावरून त्यांना टीकेचा सामना करावा लागला होत.शिवसेनेसह पर्यावरण संघटनांनी भिडे यांना लक्ष्य केले होते. २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भिडे यांची महापालिकेत बदली करण्यात आली होती. त्या सध्या महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत आहेत. आता त्यांच्याकडे पुढील आदेश येईपर्यत अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढले आहेत.लवकरच त्यांना मुंबई मेट्रो महामंडळाची संपूर्ण जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते.

- Advertisment -