घरठाणेShrikant Shinde : युतीत मिठाचा खडा टाकू नका, मी राजीनामा द्यायला तयार...;...

Shrikant Shinde : युतीत मिठाचा खडा टाकू नका, मी राजीनामा द्यायला तयार…; श्रीकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Subscribe

 

ठाणेः युतीत मिठाचा खडा टाकण्याचं काम कोणी करु नये. कोणीही आम्हाला आव्हान देण्याचं काम करु नये. विचारपूर्वक आव्हानं करावीत, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी माडंली. शिवसेनेला मदत न करण्याचा व त्यांच्या कोणत्याच कार्यक्रमाला न जाण्याचा ठराव भाजपने केला आहे. त्यावर श्रीकांत शिंदे यांनी ही भूमिका मांडली.

- Advertisement -

श्रीकांत शिंदे म्हणाले, मीही एकलं आहे की कल्याण लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार भाजप निवडणार आहे. उमेदवार कोण असेल हे वरिष्ठ पातळीवर ठरेल. मला जनतेने मोठ्या मतांनी निवडून दिलं आहे. तरीही काही आक्षेप असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. कोणीही उमेदवार द्या. मी त्याचा प्रचार करायला तयार आहे.

एका वेगळ्या विचाराने भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व एक वेगळा विचार घेऊन एकत्र आले आहेत. क्षुल्लकशा कारणावरुन युतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम कोणी करु नये. कोणा एका पोलीस अधिकाऱ्याची बदली होत नाही म्हणून आम्हाला आव्हान देण्याचे काम कोणी करु नये. विचारपूर्वक आव्हान द्यावे, असा सल्लाही श्रीकांत शिंदे यांनी भाजपला दिला.

- Advertisement -

श्रीकांत शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय काम केल हे सर्वांनीच बघितलं आहे. भाजप नगरसेवकांना सर्वाधिक निधी देण्यात आला आहे. २०२४ साली पतंप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा आमचा आणि देशातील तमाम जनतेचा निर्धार आहे . त्यासाठी आम्ही प्राणपणाने प्रयत्न करू.

मला व्यक्तीशः कोणत्याही पदाची लालसा नाही. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय शिवसेना – भाजप युतीचे वरिष्ठ नेते घेतील. मला उमेदवारी दिली नाही तरी जो कुणी उमेदवार असेल त्याचा एकदिलाने आम्ही प्रचार करू आणि त्याला विजयी करू, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

केंद्रात पुन्हा भाजप- शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन करणे हेच आमचे ध्येय आहे. त्या दिशेने आम्ही करत असलेल्या कामांना जर कुणाचा विरोध असेल, कुणाला पोटदूखी होत असेल आणि युतीमध्ये जर विघ्न निर्माण होत असेल तर मी माझ्या पदाचा राजिनामा देण्याची तयारी आहे, असेही खासदार शिंदे यांनी स्पष्ट केले.

कल्याण भाजपने केला ‘हा’ ठराव

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदार संघात शिंदेंच्या शिवसेनेसोबत काम न करण्याचा ठराव भाजपने केला आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस शेखर बागडे यांची बदली होत नाही तोपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेसोबत काम करायचे नाही, असे भाजपने ठरवले आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील वादाची अधिकृत सुरुवात झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. कारण शिंदे आणि भाजप यांच्यात वाद सुरु असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने कल्याण लोकसभा मतदारसंघात आढावा बैठक घेतली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. याला उपस्थित शेकडो पदाधिकाऱ्यांनी मंजूरी दिली. त्यानंतर भाजपचे प्रदेश सचिव गुलाबरा करंजुले यांनी शिवसेनेसोबत काम न करण्याचा ठराव मांडला. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागडे यांची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेसोबत काम न करण्याचा हा ठराव होता. शिवसेनेसोबत काम न करणे, कार्यक्रमात सहभागी न होणे असेही ठरावातून मांडण्यात आले. त्याला सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले आणि तो ठराव मंजूर झाला. आतापर्यंत चर्चा होणे आणि प्रत्यक्ष ठराव करण्यापर्यंत विषय जाणे हे गंभीर आहे, असे मत मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -