Eco friendly bappa Competition
घर ठाणे Shirkant Shinde : शिंदेंच्या शिवसेनेसोबत काम न करण्याचा भाजपचा ठराव; वादाची ठिणगी

Shirkant Shinde : शिंदेंच्या शिवसेनेसोबत काम न करण्याचा भाजपचा ठराव; वादाची ठिणगी

Subscribe

 

डोंबिवलीः खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदार संघात शिंदेंच्या शिवसेनेसोबत काम न करण्याचा ठराव भाजपने केला आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस शेखर बागडे यांची बदली होत नाही तोपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेसोबत काम करायचे नाही, असे भाजपने ठरवले आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील वादाची अधिकृत सुरुवात झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. कारण शिंदे आणि भाजप यांच्यात वाद सुरु असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने कल्याण लोकसभा मतदारसंघात आढावा बैठक घेतली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. याला उपस्थित शेकडो पदाधिकाऱ्यांनी मंजूरी दिली. त्यानंतर भाजपचे प्रदेश सचिव गुलाबरा करंजुले यांनी शिवसेनेसोबत काम न करण्याचा ठराव मांडला. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागडे यांची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेसोबत काम न करण्याचा हा ठराव होता. शिवसेनेसोबत काम न करणे, कार्यक्रमात सहभागी न होणे असेही ठरावातून मांडण्यात आले. त्याला सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले आणि तो ठराव मंजूर झाला. आतापर्यंत चर्चा होणे आणि प्रत्यक्ष ठराव करण्यापर्यंत विषय जाणे हे गंभीर आहे, असे मत मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केले.

आगरी कोळी वारकरी भवनच्या भूमिपूजन सोहळ्याला मंत्री चव्हाण उपस्थित राहिले नव्हते. भाजप कल्याण जिल्ह्याचा निर्णय म्हणून मंत्री चव्हाण कार्यक्रमाला जाणे टाळत असलीत तर भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी आपल्या सहकाऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात एकत्र यायला हवे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. राजकीय द्वेषापोटी हा गुन्हा दाखल झाला आहे. परिणामी बागने यांच्याविरोधात नव्हे तर अशा प्रवृत्तीलाच विरोध करायला हवा, असेही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते.

- Advertisement -

हेही वाचाः ‘भांडुपच्या देवानंद’चा शो भरलाच नाही..; नितेश राणेंनी कोणावर साधला निशाणा?

भिडले होते भाजप आणि शिंदे गट पदाधिकारी

ठाण्यात शिंदे गटातील माजी नगरसेवकाच्या सागंण्यावरून भाजपाच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण झाल्याचा प्रकार गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात घडला होता. ठाण्यातील परबवाडी येथे फलक बसवण्याच्या कारणावरून शिंदे गटातील पदाधिकारी आणि भाजपाचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यात वाद झाला. या वादात पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज दिली. मात्र, नंतर १५ ते २० जणांच्या जमावाने प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रशांत जाधव यांच्या डोक्याला गंभीर जखम झाले होते. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. शिंदे गटाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांच्या सांगण्यावर हा हल्ला झाला असल्याचा आरोप भाजपा कार्यकर्त्यांनी केला होता.

नाशिकमध्येही श्रेयवादासाठी दोन्ही गटात बॅनरबाजी

एप्रिल महिन्यात नाशिक शहरात शिवसेना आणि भाजपमध्येच श्रेयवादाची लढाई झाली होती. इंदिरानगर आणि राणे नगर परीसरातील बोगद्याची अर्थात अंडरपासची लांबी वाढवण्यात येणार होता. यासाठी ४७ कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले. याचे श्रेय घेण्यासाठी भाजप आणि शिवसेना, दोघंही सरसावले होते. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा फोटो असलेले बॅनर शिवसेनेने जागोजागी लावण्यात आले होते. याचा राग आल्याने भाजपने देखील आमदार देवयानी फरांदे आणि माजी महापौर सतीश कुलकर्णी यांचे बॅनर लावण्यात आले होते.

 

- Advertisment -