घरमहाराष्ट्रShrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदेंना भरसभेत दाखवले काळे झेंडे! परभणीतील घटना

Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदेंना भरसभेत दाखवले काळे झेंडे! परभणीतील घटना

Subscribe

सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, अधिवेशनाचा दुसरा आठवडा सोमवापासून सुरू होणार आहे. याच अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

परभणी : मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण आरक्षणाच्या मागणी भोवती फिरत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सभांमागून सभा घेत आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याला मंत्री छगन भुजबळांकडून विरोध होत आहे. अशातच आज रविवारी (10 डिसेंबर) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदेंना भरसभेत काही युवकांनी काळे झेंडे दाखवत गोंधळ घातला. हा प्रकार परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे घडला. (Shrikant Shinde MP Shrikant Shinde shown black flags in the assembly! Incident in Parbhani)

सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, अधिवेशनाचा दुसरा आठवडा सोमवापासून सुरू होणार आहे. याच अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. अशातच आज खासदार श्रीकांत शिंदे परभणी जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांची परभणी जिल्ह्यातील पाथरीमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे भाषणासाठी उठले असतानाच काही युवकांनी त्यांच्या भाषणादरम्यान उभे राहून काळे झेंडे दाखवले. यावेळी भरसभेत गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

हेही वाचा : Sanjay Raut : संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पलफेक; सोलापुरातील घटनेने खळबळ

युवकाना स्टेजवर बोलावून घेतल्या समस्या जाणून

श्रीकांत शिंदे भाषणासाठी उभे राहताच काही युवकांनी त्यांच्या भाषणादरम्यान काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी सुरू केली. यावेळी खासदार शिंदेंना काय होतेय याची कल्पना आली नाही. मात्र, त्यांनी यावेळी ही परिस्थिती संयमांने हाताळत घोषणा देणाऱ्या युवकांना स्टेजवर बोलावलं. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर हा प्रकार निवळला.

- Advertisement -

हेही वाचा : IT Raid On Dhiraj Sahu : साहू यांच्याकडील रोकड मोजण्यासाठी मागवली मशीन अन्…; राजकारणही तापलं

आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध असून, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रयत्न करत असून, तशी कायदेशीर पाऊलेसुद्धा उचलली जात असल्याचे यावेळी श्रीकांत शिंदे यांनी स्टेजवरून युवकांना सांगितले. त्या युवकांचे समाधान झाल्यानंतर ते स्टेजच्या खाली उतरले. असे जरी असले तरी या घडलेल्या प्रकारामुळे काहीकाळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -