घरठाणेराऊतांची महाराष्ट्राला गरज, त्यांना मानसिक आजार होतोय का?, आरोपांवर श्रीकांत शिंदेंची पहिली...

राऊतांची महाराष्ट्राला गरज, त्यांना मानसिक आजार होतोय का?, आरोपांवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर याला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी याबाबतचं पत्रक ठाणे पोलीस आयुक्त आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले होते. आता या आरोपांवर आज डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांची मला काळजी वाटते. मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. त्यांना मानसिक आजार झाला, असे लक्षण दिसत आहे. त्यात रुग्णाला भास होतात. मला कुणीतरी आवाज देतो, असे वाटते. राऊत यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. त्यांची महाराष्ट्राला गरज आहे. राऊतांमुळे महाराष्ट्रातील जनेतेचे सकाळचे मनोरंजन होत आहे, असं डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.

- Advertisement -

श्रीकांत शिंदे अंबरनाथमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. संजय राऊत यांचे आरोप हास्यास्पद आहेत. एकीकडे ते पोलिसांना चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र देतात, दुसरीकडे आपल्या जबाबात तेच म्हणतात की, माझ्यावर शाईफेक केली जाईल किंवा धक्काबुक्की केली जाईल आणि त्यांचे सहकारी सहायक संपादक चिंधरकर यांचा जबाब पोलिसांनी घेतला आहे. मी त्यांना फक्त काळजी घ्या, असे सांगितले होते.

मी कोणत्याही व्यक्तीचे नाव किंवा काय करणार हे सांगितले नव्हते, असे चिंधरकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. संजय राऊत यांचा आरोप आणि त्यांच्या जबाबत विरोधाभास आहे. पोलिसांची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत. यामुळे मला संजय राऊत यांची मला काळजी वाटते. मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. मी हाडांचा डॉक्टर असलो तरी वैद्यकीय शिक्षण घेतलेले आहे. त्यांना सिझोफ्रेनिया हा मानसिक आजार होतोय का? अशी लक्षणं दिसू लागली आहेत, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण: शिझान खानची जामिनासाठी वसई कोर्टात धाव


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -