घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशुभांगी पाटलांचा खोली क्रमांकच चुकला; ऐनवेळी अधिकार्‍यांची उडाली तारांबळ

शुभांगी पाटलांचा खोली क्रमांकच चुकला; ऐनवेळी अधिकार्‍यांची उडाली तारांबळ

Subscribe

धुळे : मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील सकाळी धुळे येथील मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहचल्या असता मतदानासाठी गेल्यानंतर खोली क्रमांक चुकल्याचे मतदान केंद्रावरील अधिकार्‍यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ दुरूस्ती करून मतदान सुरळित केले. मात्र यावेळी पाटील यांनी अधिकारयांना चांगलेच धारेवर धरले.

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ८ वाजता मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. अशातच एक तास होताच नाशिक मतदारसंघातील धुळे येथील मतदान केंद्रावर गोंधळ उडाला. यावेळी उमेदवार शुभांगी पाटील या धुळे महापालिकेच्या शाळा क्रमांक ८ येथे मतदान करण्यासाठी गेल्या असता मतदान क्रमांक मिळत नसल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर १५ ते २० मिनिटांनंतर मतदान क्रमांक मिळाल्यानंतर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र झालेल्या चुकीमुळे त्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले.

- Advertisement -
एकवीरा मातेचे घेतले दर्शन

दरम्यान मतदानापूर्वी पाटील यांनी खान्देश कुलस्वामिनी श्री एकविरा देवीचे दर्शन घेतले. या निवडणुकीत आपला विजय निश्चित असून २ तारखेला विजयाचा जल्लोष साजरा करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

नाशिककडे रवाना 

मतदानाचा हक्क बाजवल्या नंतर महाविकास आघाडीच्या पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांनी धुळ्यातून थेट मालेगावच्या दिशेने प्रस्थान केले. त्या दुपारपर्यंत नाशिक जिल्ह्यात त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात विविध मतदान केंद्रांना भेटी देणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -