घरमहाराष्ट्रआता खरी लढाई सुरू; शुभांगी पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश

आता खरी लढाई सुरू; शुभांगी पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश

Subscribe

विधानपरिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाने सर्वप्रथम शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांची महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. मात्र त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. पराभवानंतर शुभांगी पाटील यांनी मातोश्री बंगला येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तेथे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

 

मुंबईः नाशिक शिक्षक व पदवीधर मतदारसंघातून पराभूत झालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी शनिवारी ठाकरे गटात प्रवेश केला. आत खरी लढाई सुरु झालेली आहे, अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर दिली.

- Advertisement -

विधानपरिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाने सर्वप्रथम शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांची महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. मात्र त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. पराभवानंतर शुभांगी पाटील यांनी मातोश्री बंगला येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तेथे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

ठाकरे गटात प्रवेश केल्यावर शुभांगी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मी आधीच जाहिर केले की ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. त्यानुसार आज मी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. माझा पराभव झाला असला तरी आता तर खरी लढाई सुरु झाली आहे. मी एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहे. जुनी पेन्शन योजना, बेरोजगारी व अन्य प्रश्नांकडे या आंदोलनातून सरकारचे लक्ष वेधणार आहे. यापुढे शिवसेनेसाठी काम करत राहणार आहे. तुमच्यावर मोठी जबाबदारी देणार असल्याचे बोलले जात आहे, या प्रश्नावर शुभांगी पाटील म्हणाल्या, पद कोणतेही असो मी शिवसेनेसाठी काम करत राहणार आहे.

- Advertisement -

माझा पराभव झाला असला तरी मला ४० हजार मते पडली आहेत. माझी नऊ हजार मते बाद ठरली आहेत. एका सामान्य घरातील मुलीला एवढी मते मिळाली. जनतेच्या प्रेमामुळेच मला एवढी मते मिळाली हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे, असे शुभांगी पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडीने हवी तशी मदत केली नाही या प्रश्नाचे उत्तर देताना शुभांगी पाटील म्हणाल्या, मला महाविकास आघाडीने सर्वोताेपरी मदत केली आहे. नाना पटोले यांनी दोन सभा घेतल्या. शरद पवार, अजित पवार, ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी हे सर्व माझ्या सोबतच होते.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -