घरमहाराष्ट्रमाथेरानमधील शटल सेवा पर्यटकांच्या पसंतीस, महिन्याभरात ५४ लाखांचा महसूल गोळा

माथेरानमधील शटल सेवा पर्यटकांच्या पसंतीस, महिन्याभरात ५४ लाखांचा महसूल गोळा

Subscribe

पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता येथे शटल सेवाही (Shuttle service in Matheran) सुरू करण्यात आली आहे. या शटल सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मुंबईपासून अगदी हाकेच्या अतंरावर असलेले थंड हवेचे ठिकाण म्हणजे माथेरान (Tourist place Matheran). मुंबई-पुण्यापासून अनेक पर्यटक शनिवार-रविवारी येथे भेट देण्यासाठी येतात. पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता येथे शटल सेवाही (Shuttle service in Matheran) सुरू करण्यात आली आहे. या शटल सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. (Shuttle service in Matheran attracts tourists, collects revenue of Rs 54 lakh)

एप्रिल ते मे महिन्याच्या सुट्टीच्या काळात या शटल सेवेचा वापर तब्बल ७८ हजार ५७७ पर्यटकांनी केला. तर, या सेवेतून ९ हजार ११५ पार्सल वाहतूकही करण्यात आली. हाच आकडा गेल्यावर्षी ५ हजार ७३९ एवढा होता.

- Advertisement -

पर्यटाकांना स्वस्त आणि आरामदायी प्रवास देण्यासाठी शटल सेवा सुरू करण्यात आली होती. यामाध्यमातून एप्रिल ते मे २०२२ या कालावधीत ५४.५९ लाखांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये ५३.८ लाख प्रवासी महसूल आणि ७४ हजार ११७ रुपये पार्सल महसुलाचा समावेश आहे.

माथेरान हे शांत आणि हवेशीर पर्यटन क्षेत्र आहे. कोणत्याही ऋतुमध्ये इथे थंडावा असतो. मुंबईकरांना स्वस्तात मस्त पर्यटन क्षेत्राचा अनुभव घेता यावा याकरता मध्य रेल्वेने येथे आरामदायी शटल सेवा सुरू केली. या शटल सेवेला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -