घरमहाराष्ट्रनागपूर"तुमचाही दाभोळकर करू..."; धीरेंद्र शास्त्री यांना आव्हान देणाऱ्या श्याम मानव यांना धमकी

“तुमचाही दाभोळकर करू…”; धीरेंद्र शास्त्री यांना आव्हान देणाऱ्या श्याम मानव यांना धमकी

Subscribe

चमत्कारांचा दावा करणाऱ्या बागेश्वर बाबांना अंनिसचे संस्थापक संघटक श्याम मानव यांनी आव्हान दिलं होतं. त्यानंतर आता श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे सध्या चर्चेत आले आहेत. भाविक त्यांना चमत्कारी बाबा म्हणत असून त्यांची समस्या काय आहे, हे एका कागदावर लिहून देतात. त्या समस्येवर बाबा उपायही सांगतात, असा दावा केला जातोय. हे महाराज लोकांच्या अंगातली भुतंही उतरवतात, असा देखील दावा केला जातो. चमत्कारांचा दावा करणाऱ्या बागेश्वर बाबांना अंनिसचे संस्थापक संघटक श्याम मानव यांनी आव्हान दिलं होतं. त्यानंतर आता श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी त्यांचा मुक्काम असलेल्या ठिकाणची सुरक्षा वाढवली आहे.

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा नागपुरात दोन दिवस राम कथेचा दिव्य दरबार झाला. यादरम्यान अंनिसचे श्याम मानव यांनी त्यांना चॅलेंज दिलं होतं. दिव्य शक्ती सिद्ध करून दाखवल्यास त्यांना ३० लाखांचं बक्षीस देऊ, असं ते म्हणाले होते. तसंच महाराष्ट्रातील जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार, बागेश्वर बाबांविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशाराही श्याम मानव यांनी दिला होता. त्यानंतर आता श्याम मानव यांना धमकीचे मेसेज येऊ लागले आहेत.

- Advertisement -

श्याम मानव यांच्या मुलाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर धमकीचा संदेश आल्याचं कळतंय. “उद्या दुपारपर्यंत तुमची गोळी घालून हत्या करण्यात येईल, तुम्ही शांत बसा”, अशा आशयाचा हा संदेश मोबाइलवर आला आहे. त्यानंतर श्याम मानव यांच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आली आहे. श्याम मानव यांना यापूर्वीही सुरक्षा देण्यात आली होती, मात्र आता ती वाढवण्यात आली आहे. यापूर्वी श्याम मानव यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र स्पेशल प्रोटेक्शन युनिटचे २ जवान तैनात करण्यात आले होते. त्यांच्याकडे शस्त्रेही होती. पण आता त्याच्यासोबत २ SPU जवान, दोन बंदूकधारी सुरक्षा रक्षक आणि ३ पोलिसही उपस्थित राहणार आहेत. म्हणजेच आता त्याच्या संरक्षणात ४ बंदूकधारी सुरक्षा रक्षक असतील.
श्याम मानव हे गेल्या अनेक दिवसांपासून नागपूर येथील शासकीय निवासस्थानी रविभवन येथे वास्तव्यास आहेत. श्याम मानव यांच्या नागपूर येथील घराची देखील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप केला आहे. ते म्हणतात की, “बाबांकडे सिद्धी नाही. जनतेच्या भावनांशी ते खेळत आहेत. बाबा ढोंगीपणा निर्माण करत असल्याचा आरोप करत त्यांनी नागपुरात त्यांच्या मंचावर येऊन चमत्कार दाखवावे, असे आव्हान दिले. त्यांनी असे केल्यास तर आम्ही अंनिसचं काम कायमचं बंद करु, असं देखील श्याम मानव म्हणाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -