घरमहाराष्ट्रफडणवीसांच्या मर्जीतले अधिकारी साईड ट्रॅक

फडणवीसांच्या मर्जीतले अधिकारी साईड ट्रॅक

Subscribe

राज्यात २२ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या

राज्यात उद्धव ठाकरे सरकारने आता आपले बस्तान बसवले आहे. प्रशासनावर कमांड राहावी म्हणून आपल्या मर्जीतल्या अधिकार्‍यांपेक्षा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या सनदी अधिकार्‍यांची उचलबांगडी करायला सुरुवात केली आहे. गुरुवारी राज्यातील २२ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या करताना डीजीआयपीआरचे माहिती महासंचालक ब्रिजेश सिंग, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांसारख्या फडणवीस निष्ठांना त्यांच्या मुळाच्या पदावरून हटवण्यात आले आहे.

तर फडणवीस सरकारने साईड ट्रॅक केलेले पी. वेलसारू यांना मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बसवण्यात आले आहे. राज्यातील तब्बल ५० वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्यांची यादी तयार असून त्यापैकी गुरुवारी फक्त २२ जणांच्या बदल्या जाहीर झाल्या आहेत.काही प्रधान सचिवांच्या बदल्या पुढील आठवड्यात होतील.

- Advertisement -

१) दिलीप पांढरपट्टे : माहिती महासंचालक, मुंबई. २) मिलिंद शंभरकर: जिल्हाधिकारी, सोलापूर ३) जे. मुखर्जी: अपर मुख्य सचिव, अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय. ४) एस ए तागडे: प्रधान सचिव, वस्त्रोद्योग. ५) डॉ. के एच गोविंदराज : अतिरिक्त महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई. ६) बी वेणुगोपाल रेड्डी: बदली प्रधान सचिव वने. ७) राजीव जलोटा: अपर मुख्य सचिव, ग्रामविकास. ८) संजीव कुमार: आयुक्त,विक्रीकर, महाराष्ट्र राज्य, मुंबई. ९) श्वेता सिंघल: अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे. १०) प्रवीण दराडे: आयुक्त समाज कल्याण, पुणे. ११) असीम कुमार गुप्ता: प्रधान सचिव ऊर्जा १२) दीपक सिंगला: जिल्हाधिकारी, गडचिरोली. १३) शैला ए: अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी, मुंबई. १४) शेखर सिंग: जिल्हाधिकारी, सातारा.१५) पी. वेलरासू : अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका. १६) मंजू लक्ष्मी : जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग १७) आर. बी. भोसले : सहव्यवस्थापकीय संचालक, राज्य विद्युत वितरण कंपनी, कल्याण. १८) नयना गुंडे: आयुक्त, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे. १९) डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी : अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ, पुणे. २०) आर. एस जगताप: अतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर. २१) भुवनेश्वरी : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा. २२) मदन नागरगोजे : संचालक, माहिती व तंत्रज्ञान, मुंबई.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -