घरताज्या घडामोडीgunratna sadavarte: अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंचा मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज

gunratna sadavarte: अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंचा मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज

Subscribe

शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथील एसटी कामगारांच्या हल्ल्याच्या प्रकरणात डॉ गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. न्यायाधीश आर एम सादराणी यांच्या कोर्टात २१ एप्रिल रोजी गुरूवारी या प्रकरणात सुनावणी होणार आहे. सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणात याआधीच पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर, सोलापूर येथे गुन्हा दाखल झाला आहे. सध्या सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यासाठी उसकावणे तसेच कट रचणे अशा अनेक प्रकरणांमध्ये सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या बाजुने अॅड मृण्मयी कुलकर्णी हे या प्रकरणात बाजू मांडणार आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत सदावर्ते यांच्या घरात धाडी टाकल्या आहेत. तसेच अॅड सदावर्ते यांच्या पत्नीनेही दुसरीकडे अटकपूर्व जामीनासाठी धावपळ सुरू केली होती. कोर्टानेही त्यांना २९ एप्रिलपर्यंत अटक करण्यापासून दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे हे गुणरत्न सदावर्ते यांनीबी सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे.

- Advertisement -

कुठे कोणत्या गुन्ह्यांची नोंद ?

सदावर्ते यांच्याविरोधात साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपतींच्या वंशजांचा अपमान केल्याबाबत सातारा येथे सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा न्यायालयाने त्यांना या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. तर आज सोलापूरमध्ये चावडी पोलीस ठाण्यात मराठा आरक्षणाच्या निकालाचा अवमान केल्या प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापुरात दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याने शाहुवाडी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. तर अकोल्यात एसटी कर्मचाऱ्यांकडून अवैध पद्धतीने पैसे गोळा केल्या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विविध पोलीस ठाण्यातून सदावर्ते यांचा ताबा मिळवण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -