मुंबई : तब्बल 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेल्या महाराष्ट्राच्या ‘राज्य माशा’ची घोषणा मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज, सोमवारी केली. सिल्व्हर पापलेट (Silver Pomfret) हा यापुढे ‘राज्य मासा’ म्हणून ओळखला जाईल. मस्त्यपालन, पशुपालन तथा डेयरी क्षेत्रातील किसान क्रेडिट कार्ड या विषयासंदर्भात मुंबईत आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली.
‛सिल्वर पापलेट’ महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून यापुढे ओळखला जाईल अशी घोषणा आज मुंबईतील मस्त्यपालन, पशुपालन तथा डेयरी क्षेत्रातील किसान क्रेडिट कार्ड या विषयासंदर्भातील राष्ट्रीय परिषदेत करताना अतिशय आनंद झाला.#silverpofret #Maharashtra #statefish #SMUpdate pic.twitter.com/JDkBabArw5
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) September 4, 2023
रुपेरी पापलेट किनाऱ्यापासून थोडे दूर आणि 35 ते 70 मी. खोलीपर्यंत व पाण्याच्या चिखलमय तळ असलेल्या ठिकाणी थव्याने राहतात. मुंबई सागरी क्षेत्रात हे मासे पकडण्याचा हंगाम ऑक्टोबर–फेब्रुवारी या काळात जोरात चालतो. फेब्रुवारीनंतर हे मासे दक्षिणेच्या दिशेने स्थलांतर करतात. त्यांचे मांस लुसलुशीत व स्वादिष्ट असल्याने पापलेट मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. पापलेट हा मासा परकीय चलन मिळवून देणारा असल्याने त्याचे विशेष मह्त्त्व आहे. पालघर जिल्ह्याच्या सातपाटी येथील मच्छीमार सहकारी संस्थांनी सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन सिल्व्हर पापलेटला राज्य मासा म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. त्यावर गांभीर्याने विचार करून सरकारने हा निर्णय घेतला.
किसान क्रेडिट कार्ड के विषय पर मुंबई स्थित यशवंतराव चव्हाण सेंटर में आयोजित राष्ट्रीय परिषद में उपस्थित केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन तथा डेयरी मंत्री मा. परषोत्तम रूपाला जी का स्वागत बांस से विशेष रूप सें बनाई गई मत्स्य तथा व्याघ्र प्रतिमा भेंट देकर किया।@PRupala pic.twitter.com/Sgz6EyICT9
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) September 4, 2023
यशवंतराव चव्हाण केंद्रात झालेल्या या राष्ट्रीय परिषदेला केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री परषोत्तम रुपाला आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे उपस्थित होते. बांबूपासून बनवलेला मत्स्य आणि वाघाची प्रतिमा भेट देऊन मुनगंटीवार यांनी या दोघांचे स्वागत केले.