sindhudurg bank election : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची आज निवड, नारायण राणे कोणाच्या नावाला पसंती देणार?

बँकेत नुकतेच सत्तांतर झाले आहे. बँकेने गेल्या अनेक वर्षात प्रगतीचा एक टप्पा गाठला आहे. मुळात बँक हि ठेवीदारांवर चालते हि बाब नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळाला समजून घ्यावी लागेल.

sindhudurg bank Chairman-Vice Chairman election narayan rane decide who is next bank chairman

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवड आज १३ जानेवारीला होत आहे. जिल्हा बैंकेची सत्ता भाजपकड़े म्हणजेच पर्यायाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकड़े जाऊ नये यासाठी महाविकास आघाडीने खूप जोर लावला. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख व शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेला चाकू हल्ला, व त्यानंतर झालेले आरोप प्रत्यारोप व नाट्यमय घडामोडी यामुळे प्रतिष्ठेच्या बनलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत राणेंचे पारडे जड राहीले. आता निवडून आलेल्या संचालक मंडळात अतुल काळसेकर हे विद्यमान संचालक असल्याने त्यानां कामाचा अनुभव आहे.

विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव केल्यामुळे “जायंट किलर” ठरलेले कणकवलीचे विठ्ठल देसाई यांचे नाव चर्चेत आहे, तसेच संचालक मनीष दळवी हे तरुण आहेत व राणे यांचे निकट वर्तीय मानले जातात ,त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे कोणाच्या नावाला पसंती देणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले असून अध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे १३ जानेवारीला स्पष्ट होणार आहे.

त्यामुळे आता या ठीकाणी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण बसणार ? राणे कोणाला संधी देणार आहे? हे चित्र काही तासात स्पष्ट होणार आहे. तसे सावंतवाडी तालुक्यातील गजानन गावडे हे सुद्धा दावेदार मानले जात आहेत. गावडे यांनी यापूर्वी एकदा जिल्हा बँक अध्यक्षपद भूषविले आहे. व सध्या ते जिल्हा मजूर संस्था फेडरेशनचे अध्यक्ष आहेत.

नाबार्डच्या 2020-21 च्या वैधानिक लेखा परीक्षणातही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने अ दर्जा मिळविला. बँकेकडून सुमारे 40 टक्के शेतीकर्ज देण्यात आलेले आहे. 2292 कोटी ठेवी 20-21 मध्ये झालेल्या असून स्वनिधी 270 कोटींवर गेलेला आहे. येणाऱ्या आर्थिक वर्षात 5000 कोटींची उलाढाल बँकेच्या माध्यमातून करण्याचे बँकेचे धोरण आहे. बँकेचा सीडीरेषो 67.92 झालेला आहे. बँकेला 62.92 लाख ढोबळ नफा व 14 कोटी निव्वळ नफा झालेला आहे.

बँकेत नुकतेच सत्तांतर झाले आहे. बँकेने गेल्या अनेक वर्षात प्रगतीचा एक टप्पा गाठला आहे. मुळात बँक हि ठेवीदारांवर चालते हि बाब नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळाला समजून घ्यावी लागेल. मतदारांपेक्षा ठेवीदारांचा विश्वास संचालक मंडळाला संपादन करावा लागेल. नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळात बरेच तरुण आणि सहकाराचा फारसा अनुभव नसलेले संचालक आहेत. त्यांच्या समोर ठेवीदारांचा विश्वास संपादन करणे हाच मोठा आव्हानाचा मुद्दा आहे.

अध्यक्षपदासाठी मनीष दळवी तर उपाध्यक्षासाठी अतुल काळसेकरांच्या नावाला पसंती 

जिल्हा बँक अध्यक्ष पदासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कडून मनीष दळवी तर उपाध्यक्ष पदासाठी अतुल काळसेकर यांच्या नावाला पसंती दिली आहे. अध्यक्ष निवडीची बैठक प्रांत अधिकारी यांच्या उपस्थितीत सुरू झाली आहे. भाजपा ११ तर महाविकास आघाडीचे ४ संचालक बैठकीला उपस्थित आहेत. राज्यात लक्षवेधी ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँके वर भाजपाप्रणित सिद्धिविनायक सहकार पॅनलचे ११ संचालक निवडून येत निर्विवाद बाजी मारल्यानंतर अध्यक्ष पदाकरिता भाजपाकडून अध्यक्ष पदाकरिता या बँकेच्या निवडणुकीच्या कोअर कमिटी मध्ये असलेले व मतदानाचा हक्क न बजावता देखील बहुमताने विजयी झालेले मनीष दळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी अतुल काळसेकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून मनीष दळवी व अतुल काळसेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.


हेही वाचा : चुकीच्या चाचण्या, कोविड रिपोर्टमुळे पनवेलच्या नागरीकांमध्ये घबराट