सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक, मनीष दळवी मतदान करणार, नितेश राणेंना दिलासा मिळणार का?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीचा आणखी एक टप्पा आज पार पडणार आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक, मनीष दळवी मतदान करणार, नितेश राणेंना दिलासा मिळणार का?

महाराष्ट्रातील जिल्हा बँकेच्या (Sindhudurg District Bank Election) पंचवार्षिक निवडणुका झाल्या परंतु या निवडणुकांमध्ये चर्चेचा विषय ठरली ती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक, या निवडणुकीपूर्वी शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला आणि भाजप- शिवसेना यांच्यातील आरोप प्रत्योरापांमुळे निवडणुक चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. या जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे. तसेच परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपी मनीष दळवीसुद्धा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीचा आणखी एक टप्पा आज पार पडणार आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सकाळी १० वाजता नामनिर्देशन दाखल करण्यात येईल यानंतर अर्जांची छाननी पार पडल्यावर दुपारी १२ वाजता मतदान होईल. मतदानानंतर आजच दोन वाजेपर्यंत निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे.

मनीष दळवी मतदानाचा हक्क बजावणार

जिल्हा बँकेचे उमेदवार मनीष दळवी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच हक्क बजावणार आहेत. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात मनीष दळवी यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. मनीष दळवी यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. परंतु कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. मात्र मनीष दळवींना अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यामुळे दळवी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. असे आमदार नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी म्हटलं आहे.

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांच्यावर करण्यात आला आहे. नितेश राणे यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर बुधवारी सुनावणी झाली होती. यावेळी नितेश राणेंच्या वकिलांनी बाजू मांडली आहे. परंतु न्यायालयाचा वेळ संपल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आज गुरुवारी दुपारी १ वाजता नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरु करण्यात येईल.


हेही वाचा : सर्व दुकानांवर आता मराठी पाट्या राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय