घरमहाराष्ट्रअभिमानास्पद! स्वच्छ भारत अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावर

अभिमानास्पद! स्वच्छ भारत अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावर

Subscribe

स्वच्छ भारत अभियान 2 अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2022 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने पश्चिम भारतात दुसरा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याने स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत देशातील 17 हजार 450 गावं आणि 698 जिल्ह्यांमधून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची निवड करण्यात आली आहे. ‘स्वच्छ भारत अभियान 2’ अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2022 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने पश्चिम भारतात दुसरा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे.

दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर आणि पाणी स्वच्छता मिशनचे उपमुख्य अधिकारी विनायक ठाकूर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. हे सर्वेक्षण केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी सुरू केलं होतं. यावेळी संपूर्ण देशातील शाळा, कॉलेज, दवाखाणे, धार्मिक स्थळं, बाजारपेठा या ठिकाणांची पडताळणी करण्यात आली होती. या सर्वेक्षणामध्ये नागरिकांचा प्रतिसाद, थेट निरीक्षण या सगळ्याची पडताळणी करण्यात आली. त्या मूल्यमापनीमध्ये अव्वल राहिल्यानेच स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2022 मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पश्चिम भारतात दुसरा तर राज्यात पहिला क्रमांक मिळाला.

- Advertisement -

राज्यातील नवी मुंबई शहराची तिसऱ्या क्रमांकावर निवड
2022 पुरस्कारामध्ये मध्य प्रदेशमधील इंदूर शहराला लागोपाठ सहा वेळा भारतातील स्वच्छ शहर म्हणून स्थान प्राप्त झाले आहे.केंद्राच्या वार्षिक स्वच्छ सर्वेक्षणामध्ये इंदूरला लागोपाठ सहा वेळा भारतातील सर्वाधिक स्वच्छ शहर म्हणून निवडण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर सुरत आणि तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई शहराची घोषणा करण्यात आली आहे. एका लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील पाचगणीचा क्रमांक पहिल्या स्थानी आला आहे. त्यानंतर छत्तीसगढमधील पाटन दुसऱ्या क्रमांकावर आणि महाराष्ट्रातील कराड शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये हरिद्वार प्रथम क्रमांकावर आहे तर त्यानंतर वाराणसी आणि ऋषिकेशचा क्रमांक आहे.


हेही वाचा :

नवी मुंबई शहर पुन्हा एकदा स्वच्छता यादीत, 2022 च्या स्वच्छता सर्व्हेक्षणांतर्गत महाराष्ट्रातून तिसऱ्या स्थानी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -