Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र कोकणात शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले, आमदारही रस्त्यावर उतरले!

कोकणात शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले, आमदारही रस्त्यावर उतरले!

Subscribe

यात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या कार्यालयात घुसून हाणामारी केलीय. यावेळी आमदार हातात दांडा घेऊन रस्त्यावर उतरले होते.

राज्यात झालेल्या महासत्तांतरानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू झालेला संघर्ष आणखीनच उफाळून आला. याचेच पडसाद कोकणात दिसून आले. कोकणात शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यात फक्त कार्यकर्तेच नव्हे तर चक्क आमदारही हातात दांडा घेऊन रस्त्यावर उतरले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत ही घटना घडली. इथल्या कनेडी गावातील बाजारपेठेत ठाकरे गटाचा कार्यकर्ता असलेल्या एका रिक्षाचालकाला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. यावरून वादाला सुरूवात झाली आणि हा वाद थेट हाणामारीत रूपांतरीत झाला. यात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या कार्यालयात घुसून हाणामारी केलीय. यावेळी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे सुद्धा हातात दांडा घेऊन रस्त्यावर उतरले होते. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तेजीने व्हायरल होतोय.

- Advertisement -

कनेडी इथले भाजप पदाधिकारी संदेश सावंत यांचा ठाकरे गटाचा कार्यकर्ता असलेला रिक्षाचालक कुणाल सावंत यांच्यासोबत बाचाबाची झाली. यावेळी भाजपचे संदेश सावंत यांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर हा वाद आणखी चिघळला आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकत्र येत या घटनेचा जाब विचारण्यासाठी थेट भाजप कार्यालयात पोहोचले. यात आणखी शाब्दिक चकमक होऊन कार्यकर्ते आक्रमक झाले आणि एकमेकांना धक्काबुकी केली. त्यानंतर भाजप कार्यकर्तेही
जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाच्या कार्यालयात दाखल झाले. तिथे जाऊनही हा वाद काही संपला नाही आणि पुन्हा एकदा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

या घटनेची बातमी गावभर पसरल्यानंतर भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येऊ उभा राहिले. यात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आणि जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत हे देखील उपस्थित होते. आमदार वैभव नाईक स्वतः हातात दांडा घेऊन भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून येताना दिसून आले. परंतू पोलिसांनी वैभव नाईक यांना अडवलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

- Advertisement -

यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. इतकंच नव्हे तर एकमेकांच्या अंगावर काचेच्या बाटल्या फेकल्या. यात कुंभवडेचे माजी सरपंच आप्पा तावडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर ठाकरे गटाचा कार्यकर्ता असलेला रिक्षाचालक कुणाल सावंत आणि रुपेश सावंत या दोघेही गंभीर जखमी झाले. यावेळी घटनास्थळी पोलिस होते आणि परिस्थिती नियंत्रणात आली. अन्यथा हा वाद आणखी विकोपाला गेला असता. मात्र वैभव नाईक यांचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ मात्र प्रचंड चर्चेत आलाय.

- Advertisment -