सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘हा’ टोल नाका शुक्रवारपासून होणार सुरू

सिंधुदुर्गला गाडी घेऊन जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील पहिला टोल नाका शुक्रवारपासून सुरू होणार आहे. यासंदर्भात टोलवसुली सुरु करण्यात येणार असल्याची माहिती ठेका मिळालेल्या एम. डी. करीमुनिसा कंपनीकडून देण्यात आली आले आहे.

सिंधुदुर्गला (Sindhudurg) गाडी घेऊन जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव (Osargoan) येथील पहिला टोल नाका (first toll gate) शुक्रवारपासून सुरू होणार आहे. यासंदर्भात टोलवसुली सुरु करण्यात येणार असल्याची माहिती ठेका मिळालेल्या एम. डी. करीमुनिसा कंपनीकडून देण्यात आली आले आहे. परंतु, राष्ट्रीय महामार्गाची अनेक कामे अद्याप अपूर्णावस्थेत असुनसुद्धा टोल नाका सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे कामे अपूर्ण असताना टोल सुरू करण्याची घाई कशाला करातहेत, असा सवाल उपस्थित वाहनचालकांनी टोल कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्याची माहिती समोर येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यात ओसरगाव आहे. या ठिकाणी टोल नाका उभारण्यात आला असून, शुक्रवारपासून हा खुला करण्यात येणार आहे. शिवाय, रंगीत तालीम म्हणून आज दुपारी अचानक हा टोल नाका सुरू करण्यात आला आहे. परंतु, वाहन चालकांच्या सततच्या विरोधामुळे संध्याकाळी टोल घेण्याची ही रंगीत तालीम थांबविण्यात आली. त्यामुळे उद्या, शुक्रवारपासून हा टोलनाका सुरू होतो का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग 66 ची अनेक कामे अद्याप अपूर्णावस्थेत आहेत मात्र असे असताना ओसरगाव टोलनाक्यावरून उद्यापासून टोलवसुली सुरू होत आहे. त्याबाबत वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या मार्गावरची अनेक कामं रेंगाळली आहेत. त्यामुळे ती पूर्ण करुनच टोल नाका सुरु करण्याची मागणी वाहनधारकांना होणार आहे. या टोलनाक्यामुळे कोकणात जाणाऱ्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार आणि मनसेचे नेते परशुराम उपरकर (Parshuram Uparker) यांनी ही टोल घेण्यास विरोध दर्शविला होता. भाजपचे आमदार नितेश राणेंनी ही महामार्गाचे काम प्रलंबित असताना टोल घेतला गेल्यास आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – Avinash Bhosale Arrested : डीएचएफएल प्रकरणात अविनाश भोसले यांना CBI कडून अटक