Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र Sindhudurg Unlock : सिंधुदुर्गात सोमवारपासून कोरोनासंबंधीत नवे नियम होणार लागू

Sindhudurg Unlock : सिंधुदुर्गात सोमवारपासून कोरोनासंबंधीत नवे नियम होणार लागू

सिंधुदुर्गात नव्या गाईडलाईन्स

Related Story

- Advertisement -

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट होत असल्याने राज्य सरकारने पून्हा अनलॉकची घोषणा केली आहे. यातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही रुग्णसंख्या कमी होत असल्याने कोरोनासंबंधित काही नियमांमध्ये शिथिलता आणली जात आहे, सध्या सिंधुदुर्गात कोरोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर हा १२.०७ टक्के झाला असून ६६.५६ टक्के ऑक्सिजन बेड्स फुल्ल आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश चौथ्या स्तरामध्ये करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी निर्बंधांबाबतचा नवीन आदेश जाहीर केला आहे, हे नवे आदेश सोमवारपासून लागू होणार आहेत. या नव्या आदेशानुसार, जिल्ह्यात संचारबंदी कायम राहणार असून अत्यावश्यक सेवेशी संबंधित आस्थापने आणि दुकाने दुपारी चारपर्यंत सुरु राहणार आहेत. हा नवा आदेश ७ जूनपासून पुढील आदेशापर्यंत कायम राहिल. निर्बंध काही प्रमाणात शिथील केले जात असताना कोविड नियमांचे पालन बंधनकारक असेल असेही बजावण्यात आले आहे.

सिंधुदुर्गात नव्या गाईडलाईन्स

१) अत्यावश्यक सेवेतील कार्यालये, दुकाने दुपारी ४ पर्यंत सुरु राहतील. परंतु इतर सर्व दुकाने आस्थापने बंद राहतील.

- Advertisement -

२) मॉल्स, सिनेमा हॉल, नाट्यगृह बंद राहतील. रेस्टॉरंट्सना फक्त पार्सल सेवा देण्याची परवानगी असेल.

३) कृषी व कृषी पुरक सेवा सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.

- Advertisement -

४) धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक करमणुकीचे कार्यक्रम वा मेळावे यांना मनाई असेल.

५) अंत्ययात्रा वा अंत्यविधीला जास्तीत जास्त २० जण उपस्थित राहू शकतात.

६) लग्नसमारंभ जास्तीत जास्त २५ जणांच्या उपस्थिती बंधनकारक

७) बैठका, निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा ५० टक्के क्षमतेसह घेता येतील.

८) ज्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची सोय असेल अशा ठिकाणी फक्त बांधकामास परवानगी.

९) फक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या ई कॉमर्स सेवा सुरू ठेवण्यास मुभा

१०) व्यायामशाळा, सलुन, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्स ५० टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच सेवा देणे बंधनकारक असेल. ग्राहकांनी वेळ घेऊन यावे व एसी बंद ठेवणे अशा अटी असतील.

११) सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतीत बससेवा ५० टक्के क्षमतेसह सुरू राहील. प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.

१२) सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, वॉकिंग, सायकलिंग यासाठी सोमवार ते शुक्रवार सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत अशी वेळ असेल. शनिवार व रविवार बंद राहतील.

१३) शासकीय, खासगी आस्थापना व कार्यालये २५ टक्के उपस्थितीसह सुरू राहतील.

१४) मैदानी खेळांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत परवानगी असेल. शनिवार, रविवार बंद राहतील.

१५) खासगी वाहने, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वेद्वारे आंतरजिल्हा प्रवास नियमित सुरू राहील. या वाहनातून प्रवास करून स्तर पाच मधील जिल्ह्यातील थांब्यावर उतरणार असल्यास प्रवाशाकडे ई-पास असणे बंधनकारक.

१६) मालवाहतूक नियमितपणे सुरू राहील.


 

- Advertisement -