Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र माजी खासदार निलेश राणे यांची निर्दोष मुक्तता

माजी खासदार निलेश राणे यांची निर्दोष मुक्तता

Subscribe

सिंधुदुर्ग : जिल्हा न्यायालयाच्या बाहेर पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सिंधुदुर्गनगरी जिल्हा न्यायालयात याबाबत दावा सुरू होता. (sindhudurga ex mp nilesh rane given clean chit from oros court)

संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू असताना याच दरम्यान हायकोर्टाकडून आमदार नितेश राणे यांना अटके पासून दहा दिवसांसाठी दिलासा देण्यात आला होता. यावेळी आमदार नितेश राणे कोर्टातून बाहेर पडत असताना पोलिसांकडून आमदार नितेश राणे यांना अटकेचा प्रयत्न केला जात असताना त्यांना अटकाव करताना पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्याविरुद्ध ओरोस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

या प्रकरणी आज सुनावणी ओरोस जिल्हा न्यायालयात न्यायाधीश ए. एम. फडतरे यांच्या कोर्टात सुरू असताना न्यायाधीश फडतरे यांनी निर्दोष मुक्तता केली . या प्रकरणात माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजप युवा नेते आनंद शिरवलकर, युवा मोर्चा अध्यक्ष श्रीपाद तवटे, कणकवली भाजप अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष तुकाराम साईल, तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष रुपेश बिडये यांना सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.


आजारपणामुळे शरद पवार फक्त चार मिनिटंच बोलले; वळसे पाटलांनीच वाचून दाखवलं भाषण

- Advertisement -
- Advertisement -
माजी खासदार निलेश राणे यांची निर्दोष मुक्तता
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -