घरमहाराष्ट्रसिंधूताई सकपाळांचा इंदोरीकर महाराजांना पाठिंबा, म्हणाल्या...

सिंधूताई सकपाळांचा इंदोरीकर महाराजांना पाठिंबा, म्हणाल्या…

Subscribe

‘स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होत असतो. स्त्रीसंग जर विषम तिथीला झाला, तर मुलगी होत असते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदार मातीत घालणारी होत असते’, असे विधान केले होते.

गेले आठवडाभर कीर्तनकार इंदोरीकर महारांजांनी केलेल्या वक्तव्यामुळे सुरू असलेल्या वादावर आता सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. इंदोरीकर महाराजांकडून कीर्तनामध्ये पौराणिक दाखले देत असताना एखादं चुकीचं वाक्य गेलं असेल त्याचं एवढं कशाला भांडवल करता? असा सवाल सिंधुताई सकपाळ यांनी केला आहे. त्यांनी सिंधूताई सपकाळ यांनी इंदोरीकर महाराजांना पाठिंबा दर्शवला आहे.

सिंधूताई म्हणाल्या…

“इंदोरीकरांचं योगदान फार मोठं आहे. त्यांनी आपल्या प्रबोधनातून तरुणांना वाईट मार्गातून बाजूला करत स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला. अशावेळी त्यांच्याकडून एखादं चुकीचं वाक्य गेलं असेल तर त्याचं भांडवल करण्याची गरज नाही.त्यामुळे त्यांनी आपण चुकलो असं म्हणत आपलं कार्य सुरु ठेवावं”, असा सल्ला सिंधूताईंनी इंदोरीकरांना दिला आहे. त्याचप्रमाणे टीका करणाऱ्यांनाही महाराजांच्या शब्दाला धरून न बसता त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन वाद मिटवता घ्यावा असा सल्ला सिंधूताईंनी दिला आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले होते?

‘स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होत असतो. स्त्रीसंग जर विषम तिथीला झाला, तर मुलगी होत असते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदार मातीत घालणारी होत असते’, असे विधान केले होते. यासाठी त्यांनी भागवत, ज्ञानेश्वरी आणि पुराणाचे संदर्भ दिले होते. यासंदर्भात ‘आपलं महानगर’ने सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर राज्यात त्याचे पडसाद उमटले होते. अनेकांनी महाराजांचे समर्थन करत त्यांना सपोर्ट करणाऱ्या पोस्ट समाज माध्यमांवर प्रसारित केल्या होत्या. तर महिलांना संघटनांनी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अंधश्रध्दा निर्मुलन समितीदेखील त्यांच्याविरोधात उभी ठाकली. तृप्ती देसाई यांना तर या कारणावरुन शिवराळ भाषेत शिवसेनेच्या महिला कार्यकर्तीने धमकावले होते. त्यामुळे महाराज वादात सापडले. वादात सापडल्यानंतर देखील त्यांनी आपल्या विधानाशी सहमती व्यक्त करत त्यासाठी पुराणाचे दाखले दिले होते.

काय म्हणाले इंदुरीकर महाराज?

‘महाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, किर्तनकार, शिक्षक, शिक्षिका, डॉक्टर, वकील आणि मातासमान असलेला तमाम महिला वर्ग. गेल्या आठ दिवसांपासून माझ्या किर्तनाच्या सेवेतील त्या वाक्यामुळे सोशल मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक्स मिडीयासह इतर समाज माध्यमात माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. मी वारकरी संप्रदायाचा पाईक असून माझ्या २६ वर्षाच्या किर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाज संघटन, अंधश्रध्दा निर्मुलन व विविध जाचक रुढी परंपरा यावर भर दिला होता. माझ्या किर्तनरुपी सेवेतील त्या वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो’.

- Advertisement -

हे ही वाचा – संभाजी भिडेंनी भीमा-कोरेगावमध्ये वेगळं वातावरण तयार केलं – शरद पवार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -