घरमनोरंजनप्रसिद्ध गायक आनंद शिंदेच्या गाडीला अपघात

प्रसिद्ध गायक आनंद शिंदेच्या गाडीला अपघात

Subscribe

सोलापूर महामहामार्गावर इंदापूर जवळ असणाऱ्या वरकुटे गावाजवळ ही अपघाताची घटना

शिंदे घराण्यातील प्रसिद्ध गायक आनंद शिंदे याच्या गाडीचा अपघात झाला आहे. हा अपघात सोमवारी रात्री झाला असून सोलापूरहून मुंबईकडे येताना हा अपघात घडला. पुणे- सोलापूर महामहामार्गावर इंदापूर जवळ असणाऱ्या गावाजवळ ही अपघाताची घटना घडली. या अपघातातून आनंद शिंदे थोडक्यात बचावले असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, पहाटेच्या वेळी झालेल्या अपघातामध्ये आनंद शिंदे यांच्या पायाला मार लागल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात आनंद शिंदे यांच्या पायाला दुखापत झाल्याने इंदापूरमध्ये असणाऱ्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पायाला किरकोळ मार लागल्याने अपघातानंतर आनंद शिंदे पुण्याला रवाना झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -