घरमहाराष्ट्रबहीण भावाचा नदीत बुडून मृत्यू!

बहीण भावाचा नदीत बुडून मृत्यू!

Subscribe

या अपघातामुळे पवार कुटुंबियांवर दुखाचे डोंगर कोसळले आहे.

पुण्यातील आंबेगाव तालुका येथे घोडनदीत कपडे धुण्यास गेलेल्या बहिण-भावाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. वडगाव काशिंबेग येथील ढुमा डोहात आज ही दुर्दैवी घटना घडली. कपडे धुत असताना दोघांचाही पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. त्यांना पोहता येत नसल्यामुळे त्यांच्या बहीन भावडांणी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते बचावले नाहीत.

बहिणीचे नाव काजल विजय पवार(१५) तर, भावाचे प्रेम विजय पवार(१०) असे आहे. यांचे आईवडील शेतीला आवश्यक असणारी खुरपी आणि इतर अवजारे तयार करण्याचे काम करतात. पवार कुटूंब पोट भरण्यासाठी पुण्याच्या विश्रांतवाडी येथे एकमहिन्यापूर्वी राहण्यासाठी आले होते. विजय पवार यांना ५ मुले आहेत. दिव्या, काजल, प्रेम, क्रिश आणि अनिल असे त्यांचे नावे आहेत. चाकणयेथे शनिवारी मोठा बाजार भरतो. नेहमीप्रमाणे विजय आणि त्यांची पत्नी खुरपी आणि इतर अवजारे विकण्यासाठी चाकणच्या बाजारात गेली होती. शाळेला सुट्टी असल्यामुळे त्यांची मुलगी दिव्या, काजल आणि प्रेम, क्रिश,अनिल ही मुले घरीच होती. काहीवेळाने त्यांनी नदीवर कपडे धुवायला जायचा निर्णय घेतला. अनिल याला घरी ठेऊन ही चार भावंडे कपडे धुण्यासाठी घोडनदीवर गेले. त्यावेळी कपडे धुत असताना काजल आणि प्रेमचा दगडावरुन पाय घसरला आणि ते दोघही नदीत पडले. ते दोघजण बुडत असताना इतर बहीण-भावडांनी मोठा आरडाओरडा केला. यांचा आवाज ऐकून जवळील ग्रामस्थांनी धाव घेतली. त्यानंतर दोघांना पाण्याबाहेर काढण्यात आले, मात्र तो पर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. या अपघातामुळे पवार कुटुंबियांवर दुखाचे डोंगर कोसळले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -