घरमहाराष्ट्रत्र्यंबक प्रकरणाऐवजी कुरुलकर प्रकरणी SIT नेमा; संजय राऊतांचे सरकारला आव्हान

त्र्यंबक प्रकरणाऐवजी कुरुलकर प्रकरणी SIT नेमा; संजय राऊतांचे सरकारला आव्हान

Subscribe

त्र्यंबक प्रकरणी एसआयटीची नेमणूक करण्यापेक्षा डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमा, या प्रकरणावर बोला असे आव्हान ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्य सरकारला दिले आहे.

राज्यात सध्या त्र्यंबकेश्वरमधील वादावरून वातावरण तापलेले आहे. सोमवारी काही मुस्लिमांनी त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात फुलांची चादर घेऊन घुसण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती समोर आली. या प्रकरणाची राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत SIT नेमण्याचे आदेश दिले आहेत. तर या प्रकरणी आता चार उरूस आयोजकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, या प्रकरणी एसआयटीची नेमणूक करण्यापेक्षा डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमा, या प्रकरणावर बोला असे आव्हान ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्य सरकारला दिले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी या प्रकरणी आपले मत व्यक्त केले आहे. (SIT appointed in Kurulkar case instead of Trimbak case; Sanjay Raut’s challenge to the government)

हेही वाचा – डॉ. कुरुलकर प्रकरणाचे नाशिक कनेक्शन? ATSकडून तपासाला वेग

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर प्रकरणी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे हे खेळ सुरू आहेत. आज जे सत्तेवर आहेत ते अनैतिक मार्गाने सत्तेवर आले आहेत. लोकांचा पाठिंबा त्यांना नाही. ते नकली हिंदुत्वाच्या नावावर भजन करत आहेत. अशावेळी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या नावाने काही टोळ्या निर्माण करायच्या आणि संपूर्ण वातावरण बिघडवायचे. असा एक कट दिसून येत आहे, असे म्हणत राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला.

आमचे हिंदुत्व ढोंगी नाही
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मी बोलल्यानंतर ते लोक बोलतील संजय राऊत यांचा हिंदुत्वाशी संबंध काय? ते तर महाविकास आघाडीत आहेत. हेच ते लोक असे प्रश्न निर्माण करणारे. आमच्या इतकं कडवट हिंदुत्ववादी या देशात दुसरं कोणी नसेल. आम्ही ढोंगी नाही. म्हणून हे मी परखडपणे सांगू शकतो की त्र्यंबकेश्वर हा आमच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. तिथे कधीही अशा प्रकारच्या घटना घडल्याची माहिती नाही. मी आणि माझे कुटुंब अनेकदा तिथे जातो, अशी माहिती यावेळी त्यांच्याकडून देण्यात आली.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर मंदिरात कोणीही घुसले नाही
या घटनेसंदर्भात माहिती देताना संजय राऊत यांनी सांगितले की, कोणीही मंदिरात घुसल्याची माहिती नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून अशा प्रकारचं पत्र त्यांना द्यायला लावलं. त्यांनीच आज त्र्यंबकेश्वरमध्ये बंद, आंदोलन सुरू केलं आहे. मुस्लीम समाजाचे एक सुफी संत आहेत. त्यांचा उरूस निघतो, गेल्या 100 वर्षांपासून ही परंपरा असल्याची माहिती मिळाली आहे. त्या परंपरेनुसार ते मंदिराच्या गेटवर आपल्या देवांना धूप दाखवून पुढे जातात. त्यानुसार ते सगळं झाले होते. महाराष्ट्रात आणि देशात या परंपरा सर्वत्र आहेत.

संघाचेही लोकं दर्ग्यात जातात
पंतप्रधानांपासून सगळेच अजमेर शरीफच्या दर्ग्यावर जातात. त्या ठिकाणी नवस करून पुजाअर्चा करण्यात येते. माहिम दर्गा, हाजीअली दर्गा या ठिकाणी हिंदु जातो. त्याच्यामध्ये संघाचेही लोकं आहेत, अशी माहिती असल्याचे यावेळी राऊत म्हणाले. तसेच या सगळ्या ठिकाणी पोलिसांच्यावतीनेही चादर चढवली जाते. हा श्रद्धेचा विषय आहे.

नकली हिंदुत्वाच्या नावावर वातावरण खराब करण्याचा प्रयत्न
त्र्यंबकच्या निमित्ताने महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुन्हा एकदा नकली हिंदुत्वाच्या नावाने बोंबा मारायच्या, टीका करायच्या असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

राम नवमी संदर्भात एसआयटी नेमली का?
एसआयटी कसल्या नेमता? तुम्हाला माहीत नाही महाराष्ट्रात काय चाललं ते? राम नवमी संदर्भात एसआयटी नेमली का? राम नवमीला कधी नव्हे त्या दंगली झाल्या. गेल्या 60 वर्षात महाराष्ट्रात दंगल झाली नव्हती. त्यावर एसआयटी नेमली का नाही नेमली? अशा अनेक प्रकार आहेत. या सरकारच्या पायाखालची जमीन हादरली आहे. त्याचा हा परिणाम आहे. राज्यात सामाजिक सलोखा राखायला हवा. दंगली घडवून निवडणुका जिंकायचं असेल तर ते होणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

कुरुलकर प्रकरणी एसआयटी नेमण्याचे आव्हान
DRDO चे अधिकारी डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, देशद्रोही कोण हे दिसून येतंय. आरएसएसचा प्रमुख प्रचारक जो पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये येतो. त्याच्यावर ना भाजप एसआयटी नेमत, ना काही बोलत. या प्रकरणाचे नाशिकपर्यंत धागेदोरे पोहोचले आहेत. हवाई दलाचे लोक त्यात अडकले आहेत. हे सगळे संघाशी संबंधित आहेत. भाजपशी संबंधित आहेत. त्यासाठी नेमा एसआयटी. पण त्याच्यावरच लक्ष विचलीत करण्यासाठी त्र्यंबकेश्वर, अकोला, शेवगाव या दंगली घडवण्यात येत आहेत, असा आरोप यावेळी राऊतांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -