घरमहाराष्ट्रचुंबनप्रकरणी एसआयटी, मग बार्शीप्रकरणी का नाही? संजय राऊतांचा सरकारला सवाल

चुंबनप्रकरणी एसआयटी, मग बार्शीप्रकरणी का नाही? संजय राऊतांचा सरकारला सवाल

Subscribe

Sanjay Raut News | राऊत यांच्या या ट्वीटमुळे त्या पीडित मुलीची ओळख समोर आल्याने संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sanjay Raut News | मुंबई – बार्शीप्रकरणातील मुलीचा फोटो ट्वीट केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांनी सराकरविरोधात संताप व्यक्त केला आहे. एका चुंबनप्रकरणावरून एसआयटी स्थापन केली जाते पण मुलीच्या हत्येविरोधात चौकशी का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच, हत्याप्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केल्याप्रकरणी एका खासदारावर आणि पत्रकारावर गुन्हा दाखल होत असेल तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कशी कोठ्यावर नाचतेय हे स्पष्ट होतंय, असं म्हणत त्यांनी सरकारला धारेवर धरलं. आज ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – दादा भुसेंकडून शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक! संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

- Advertisement -

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. त्या मुलीचा फोटो संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटरला शेअर करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. राऊत यांनी फोटो ट्वीट करत लिहिले होते की “देवेंद्रजी हे चित्र बार्शीतले आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजप पुरस्कृत गुंडांनी हा हल्ला केला आहे. पाच मार्चला हा हल्ला झाला आहे. आरोपी अद्याप मोकाट आहेत.” राऊत यांच्या या ट्वीटमुळे त्या पीडित मुलीची ओळख समोर आल्याने संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पत्रकारांनी आज संजय राऊतांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, ज्या मुलीवर कोयत्याचे वार झाले आहेत. त्या मुलीचे पालक माझ्याशी बोलले. जर माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही तर मला इच्छा मरणाची परवानगी द्या अशी मागणी करतेय. तिच्या आईने मरणाची इच्छा व्यक्त केली आहे. पारधी समाजातील ही मुलगी आहे. बार्शीतील काही गुंडाच्या टोळीने तिच्यावर हल्ला केला. अजूनही गुंड बाहेर आहेत. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायचं असेल तर ज्या माध्यमातून पोचवायला हवे त्या माध्यमातून मी पोचवले. मी त्या मुलीचं नाव किंवा ओळख स्पष्ट केली नाही. हे रक्त वाया जाऊ देऊन का इतकंच म्हटलं. यावरून माझ्यावर गुन्हा दाखल होणार असेल राज्यातील कायदा कोणत्या पद्धतीने काम करतंय हे दिसतंय असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ ट्वीटमुळे गुन्हा दाखल

तसंच, कुटुंबातील व्यक्तीसाठी एसआयटी लावतात, एका चुंबनप्रकरणात एसआयटी लावता मग बार्शीप्रकरणी का लावली नाही असा सवाल उपस्थित करत त्याप्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केल्याप्रकरणी एका खासदारावर आणि पत्रकारावर गुन्हा दाखल होत असेल तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कशी कोठ्यावर नाचतेय हे स्पष्ट होतंय, असं म्हणत त्यांनी सरकारला धारेवर धरलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -