घरमहाराष्ट्रआता राहुल शेवाळे अडचणीत, बलात्कारप्रकरणात एसआयटी चौकशीचे निर्देश

आता राहुल शेवाळे अडचणीत, बलात्कारप्रकरणात एसआयटी चौकशीचे निर्देश

Subscribe

Rahul Shewale Rape Case | राहुल शेवाळे यांनी एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप जुलै महिन्यातकरण्यात आला होता. लग्नाचं आमिष दाखवून खासदार राहुल शेवाळे यांनी आपलं मानसिक आणि शारीरिक शोषण केलं असा आरोप दुबईतील एका व्यापारी महिलेने केला होता. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.

नागपूर – राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी लोकसभेत दिशा सालिअनप्रकरणी आदित्य ठाकरेंवर दोषारोप केल्यानंतर आज त्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले. दिशा सालिअन प्रकरणाची एसआयटी चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिलेले असताना राहुल शेवाळे यांच्याविरोधातही एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी केली आहे. त्यांची मागणी मान्य झाली असून विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी राहुल शेवाळे प्रकरणात एसआयटी चौकशीचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.

हेही वाचा दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची SIT मार्फत चौकशी; उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

- Advertisement -

राहुल शेवाळे यांनी एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप जुलै महिन्यात करण्यात आला होता. लग्नाचं आमिष दाखवून खासदार राहुल शेवाळे यांनी आपलं मानसिक आणि शारीरिक शोषण केलं असा आरोप दुबईतील एका व्यापारी महिलेने केला होता. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.

या पीडित महिलेला याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायची, लोकसभा सेक्रेटेरीला भेटायचं आहे. मुंबई पोलीस आयुक्तांना भेटायचं आहे. पण याप्रकरणात पोलीस हस्तक्षेप करत नाही. तिला मुंबईत यायचं आहे, परंतु, राजकीय दबावापोटी ती मुंबईत येऊ शकत नाही, याप्रकरणी मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहेत. या प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी करत आहे, असं मनिषा कायंदे म्हणाल्या.

- Advertisement -


दिशा सालिअनप्रकरणी राज्य सरकारने एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणात आज विधानसभेत बराच गोंधळ झाला. नितेश राणेंसह सत्ताधाऱ्यांनी अध्यक्षांच्या व्हेलसमोर येत आंदोलन केले. गदारोळ वाढल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा – विधानभवनात आता कागदी कपातून चहा, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओनंतर नीलम गोऱ्हेंचे निर्देश

यावरून ‘माझ्या अख्यारित हा विषय आहे असं तुम्हाला वाटत असेल तर एका प्रकरणात एसआयटी चौकशीचे आदेश दिले असतील तर खासदार राहुल शेवाळे यांच्या विषयातही एसआयटी चौकशी करण्याचे मी राज्य सरकारला निर्देश देतेय,’ असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

काय आहे प्रकरण?

दुबई येथे राहणाऱ्या एका महिलेने राहुल शेवाळे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केला होता. मी जेव्हा दुबईत असायचे तेव्हा खासदार मला दिल्लीच्या खासदार निवासात रात्री जेवणासाठी आमंत्रित करत असते. ऑक्टोबर २०२१ मध्ये, मी माझा आणि शेवाळे यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. याविरोधात शारजाहमध्ये माझ्याविरोधात तक्रार दाखल केली गेली. मला अटक करण्यात आली. मी ७८ दिवस तुरुंगात काढले. एप्रिल २०२२ मध्ये साकीनाका पोलीस ठाण्यात संबंधित महिलेने राहुल शेवाळे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली होती. परंतु, त्याविरोधात कारवाई झाली नाही, असं या महिलेने सांगितलं होतं.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -