घरताज्या घडामोडीॲन्टॉप हिल हत्याप्रकरण : कोणालाही पाठीशी न घालण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन

ॲन्टॉप हिल हत्याप्रकरण : कोणालाही पाठीशी न घालण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन

Subscribe

मुंबईतील बहुचर्चित वडाळा येथील पोलीस ठाण्यात चौकशीसाठी गेलेल्या ॲन्टॉप हिलचे विजय सिंह यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी एस.आय.टी. (विशेष तपास पथक) मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीवरील सूचनेच्या चर्चेच्यावेळी दिली. दरम्यान, याप्रकरणी केईएम रुग्णालयाचा अंतिम अहवाल येणे बाकी असून कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. भाजप आमदार भाई गिरकर यांनी या प्रकरणाची लक्षवेधी सूचना बुधवारी हिवाळी अधिवेशनात मांडली. या प्रकरणात दोषी असलेल्या सर्व अधिकाऱ्यांसह इतर पोलिसांवर कारवाईचे आदेश देण्याचे मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

चार पोलीस अधिकारी निलंबित – एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे म्हणाले की, या प्रकरणात एक पोलीस उपनिरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक, एक हेड कॉन्स्टेबल, एक पोलीस नाईक आणि एक पोलीस कॉन्स्टेबल यांना २९ ऑक्टोबर २०१९ रोजी निलंबित करण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी गु.प्र.शा., गु.अ.वि.कक्ष-४ यांच्याकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी के.ई.एम. हॉस्प‍िटलकडील डेथ ऑफ कॉजचा अंतिम अहवाल येणे बाकी आहे. राज्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत तसेच सदस्यांनी केलेली मागणी आणि त्यांच्या भावना लक्षात घेता या प्रकरणाची एस.आय.टी. मार्फत चौकशी करण्यात येणार आहे, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. तर पोलिसांनी नागरिकांशी कसे वागावे अशी मागणी देखील सूचना यावेळी आमदार विद्या चव्हाण यांनी केली होती. या मागणीबाबत ही त्यांनी सकारात्मक पवित्रा दर्शवित यासंदर्भात पोलिसांना सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या चर्चेत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री डॉ. रणजित पाटील, प्रसाद लाड, हेमंत टकले, विद्या चव्हाण यांनी सहभाग घेतला.

- Advertisement -

हेही वाचा – नागपूर आमदार निवासात दारूड्यांचा उच्छाद; आमदाराकडेच मागितले पैसे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -