घरताज्या घडामोडीMoney laundering case: माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे ईडी कार्यालयात दाखल

Money laundering case: माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे ईडी कार्यालयात दाखल

Subscribe

माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे ईडी कार्यालयात काही वेळापूर्वी दाखल झाले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मनी लाँड्रिंग आणि पोलिसांच्या बदल्या प्रकरणात ईडीकडून सीताराम कुंटे यांची चौकशी होत आहे. यापूर्वी देखील चौकशी करण्यासाठी सीताराम कुंटे यांना समन्स बजावण्यात आले होते. पण त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नकार दिला होता.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याच्या कार्यकाळादरम्यान अनेक पोलिसांच्या बदल्या झाल्या होता. त्यावेळेस सीताराम कुंटे हे राज्याचे मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. त्यामुळे ईडीने याप्रकरणी सीताराम कुंटे यांना समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे आज सकाळी ११ च्या सुमारास सीताराम कुंटे ईडी कार्यालयात दाखल झाले. ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल होताना कुंटे यांनी स्वतःसोबत अनेक कागदपत्र घेऊन आल्याचे दिसले.

- Advertisement -

यापूर्वी सीताराम कुंटे यांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित १०० कोटी वसूली प्रकरणात ईडी आणि सीबीआयकडून समन्स पाठवण्यात आले होते. मात्र, कुंटे यांनी ईडी आणि सीबीआयच्या समन्सला महत्व न देता राज्य सरकारच्या सूचनेनुसार चौकशीसाठी गैरहजर राहीले होते.


हेही वाचा – निवृत्तीच्या दहा मिनिटात सीताराम कुंटे बनले मुख्यमंत्र्याचे प्रधान सल्लागार


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -