घरताज्या घडामोडीपिंपरी-चिंचवडमध्ये भीषण अपघात; रस्त्यावरुन चालणाऱ्या सहा जणांना टँकरने उडवले

पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण अपघात; रस्त्यावरुन चालणाऱ्या सहा जणांना टँकरने उडवले

Subscribe

पिंपरी-चिंचवडमधील जुनी सांगवी परिसरात भीषण अपघात घडला असून या अपघातात रस्त्यावरुन चालणारे सहा जण जखमी झाले आहेत.

पिंपरी-चिंचवडमधील जुनी सांगवी परिसरात भीषण अपघात घटना आहे. या अपघातात सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील दोन जणांची प्रकृती गंभीर असून सध्या त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे. रविवारी रात्री ९.३० च्या दरम्यान, हा भीषण अपघात घडला आहे. चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. सुदैवाने या कोणतीही मोठी हानी झालेली नाही. परंतु, चालक फरार असून त्याचा शोध सुरु आहे.

असा घडला अपघात?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; पिंपरी-चिंचवडमधील जुनी सांगवी परिसरात डिझेल टँकर क्रमांक (एम.एच-१४ एच.यू- ६८७२) हा सांगवी फाटा येथून माकन चौक जुनी सांगवीच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. दरम्यान, टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याने चालत जात असलेल्या व्यक्तींना टँकरने भीषण धडक दिली. त्यानंतर टँकर एका इलेक्ट्रिक खांबाला जावून ध़डकला. त्यानंतर टँकर चालकाने घटनस्थळावरून पळ काढला.

- Advertisement -

या अपघातात सहा जणांना धडक दिली असून सध्या चार जणांची ओळख पटली आहे. त्यातील, दोघांची प्रकृती गंभीर असून इतर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेप्रकरणी राधेश्याम बब्रुवान (२६) आनंदनगर जुनी सांगवी येथे राहणाऱ्या व्यक्तींनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात टँकर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – धक्कादायक : मृतदेहांची अदलाबदल; नाशिकचा मृतदेह थेट मध्यप्रदेशात

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -