Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राज्यातील सहा हजार एसटी गाड्यांचा सेवेतून निरोप, १५ लाख प्रवाशांना बसणार फटका

राज्यातील सहा हजार एसटी गाड्यांचा सेवेतून निरोप, १५ लाख प्रवाशांना बसणार फटका

राज्य परिवहन महामंडळ ५०० गाड्या घेणार भाडेतत्त्वावर 

Related Story

- Advertisement -

राज्यातील लालपरी अर्थात एसटी बससेवा गेल्या काही वर्षांपासून मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करतेयं. यातच कोरोना काळात आर्थिक संकट आणखी वाढू नये यासाठी एसटी महामंडळाने आपली लालपरी मुंबईकरांच्या सेवेसाठी पाठवली. अशापरिस्थितीतही एसटीला आर्थिक गाडा चालवण्यात अनेक अडचणीच येत आहे. परंतु अशा परिस्थितीत राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेतील सुमारे ५ हजार एसटी गाड्या प्रवासी सेवेतून आता निरोप घेणार आहेत. याचा मोठा फटका आता दैनंदिन एसटी प्रवास करणाऱ्या जवळपास १० ते १५ लाख प्रवाशांना बसणार आहे. राज्य परिवहन महामंडळ ५०० गाड्या भाडेतत्त्वावर घेणार असले तरी प्रवासी संख्या पाहता या गाड्याही अपुऱ्या पडणार आहेत. परंतु या सेवेतून बाद झालेल्या गाड्या टप्यापटप्प्याने बंद होतील ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळली जाईल अशी माहिती एसटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शेखर चन्ने यांनी दिली.

राज्य परिवहन महामंडळ ५०० गाड्या घेणार भाडेतत्त्वावर 

सध्या राज्य परिवहन महामंडळाकडे एकूण १८ हजार गाड्यांचा ताफा आहे. या गाड्यांमधून दररोज सुमारे ६० लाखाहून अधिक प्रवाशांची वाहतूक सुरु असते. परंतु आर्युमान संपल्य़ाने ताफ्यातील ३ हजार गाड्या पूर्णत: बंद होणार आहेत. तर २ हजार गाड्यांना वापर मालवाहतुकीसाठी केला जाणार आहे. त्याचप्रमाणे १ हजार गाड्यांना तांत्रिक कारणांसाठी डेपो व कार्यशाळेत दुरुस्तीसाठी पाठवले जाणार आहे. सुमारे ५ हजार गाड्या सेवेतून बाद होत असल्याने दररोज १० ते १५ लाख प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

एसटी महामंडळ ९ कोटींच्या आर्थिक तोट्यात

- Advertisement -

एसटी महामंडळ ९ कोटींच्या आर्थिक तोट्यात असल्याने नव्या गाड्या खरेदी करण्यासाठी पैसा शिल्लक नाही. परंतु भाडेतत्त्वावर घेणाऱ्या गाड्यांसाठी एसटी स्वत:चे पेट्रोल पंप सुरु करणाार आहे. या भाडेतत्त्वावरील गाड्यांनी एसटी महामंडळाच्याच पेट्रोल भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. सध्या एका एसटी बसला किलोमीटरमागे ४४ रुपयांचा खर्च येतोय. भाडेतत्त्वावरील गाड्यांना २५ ते ३० रुपये खर्च आल्याने किलोमीटरमागे १४ रुपये बचत होईल. त्यामुळे एसटीला जास्त उत्पन्न देणाऱ्या प्रमुख मार्गांवरच या गाड्या धावणार आहेत.


World Day Against Child Labour : कोरोना व्हायरसपासून बालकांच्या संरक्षणासाठी UNICEF करणार मदत

- Advertisement -