घरमहाराष्ट्रसोलापूर : महाराष्ट्र बँकेचा स्लॅब कोसळून १ ठार; १५ जखमी

सोलापूर : महाराष्ट्र बँकेचा स्लॅब कोसळून १ ठार; १५ जखमी

Subscribe

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरातील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत स्लॅब कोसळल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरातील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. ही दुर्घटना आज सकाळी ११. ३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत २० ते २५ ग्राहक आणि कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत सहा जखमींना बाहेर काढण्यात आले असून आठ जखमींना कुटीर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. तसेच सध्या याठिकाणी अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -