‘रंगांसोबत त्यांची मानसिकता बदलायची होती’

'झोपड्यांचा रंग बदलण्यासोबतच इथल्या लोकांच्या मानसिकतेमध्येही बदल घडवून आणणं', हा त्यांचा मूळ उद्देश होता

Slums in Pune being coloured under 'Misaal Mumbai' foundation
सौजन्य- ANI

आपल्या देशात सामाजिक कार्य करणारी अनेक लोक आणि अनेक समाजसेवी संस्था आहेत. त्यातीलच एक आहे ‘मिसाल मुंबई’ ही संस्था. या संस्थेने पुणे शहरातील झोपडपट्ट्यांच्या सुशोभिकरणाचे काम नुकतेच पार पाडले. ‘मिसाल मुंबई’ या संस्थेने ‘नागी आर्ट फाउंडेशन’ या एनजीओच्या साहाय्याने हा अनोखा उपक्रम राबवला. नागी आर्ट फाउंडेशनच्या संस्थापिका रुबल नागी आणि त्यांच्या टीमने या विशेष उपक्रमांतर्गत सदर झोपडपट्टीचा चेहरा-मोहराच बदलून टाकला. या कामाविषयी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलतना रुबल नाही म्हणाल्या की, ‘या वस्तीतील लोकांशी आर्ट अर्थात कलेच्या माध्यमातून जोडलं जावं अशी माझी इच्छा होती. झोपड्यांचा रंग बदलण्यासोबतच इथल्या लोकांच्या मानसिकतेमध्येही बदल घडवून आणणं, त्यांचा दृष्टीकोन बदलणं हा आमचा मूळ उद्देश होता.’

रुबल नागी पुढे म्हणाल्या की, ‘जेव्हा आम्ही हा उपक्रम हाती घेतला तेव्हा इथले लोक कसा प्रतिसाद देतील याची कल्पना नव्हती. मात्र, ज्यावेळी आम्ही २० भिंती रंगवून पूर्ण केल्या तेव्हा आमच्यामागे सुमारे २०० लोक जमा झाले होते. मी कोण आहे, नक्की कशासाठी हे काम करत आहे, माझा उद्देश काय आहे?’ याविषयी जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता होती. मात्र, थेट त्यांच्यासोबत बोलून जनजागृती करणं शक्य नसल्यामुळे आम्ही रंगांचा पर्याय निवडला.’ ‘सलाम मुंबई’ फाउंडेशनने आजवर राज्यात असे अनेक उपक्रम उपक्रम राबवले आहेत.