घरमहाराष्ट्रराज्यसभा निवडणूक : छोटे पक्ष, अपक्षांची भूमिका गुलदस्त्यात; आघाडी आणि भाजपचा जीव...

राज्यसभा निवडणूक : छोटे पक्ष, अपक्षांची भूमिका गुलदस्त्यात; आघाडी आणि भाजपचा जीव टांगणीला

Subscribe

हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडे तीन मते आहेत. ही मते मिळविण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने प्रयत्न चालविले आहेत. भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी भेट घेतल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जाणारे गिरीष महाजन यांनी सोमवारी रात्री हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन मनधरणी केली. मात्र ठाकूर यांनी अद्याप आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.

राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha elections) ४८ तासांवर येऊन ठेपली तरीही छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार (independent MLA) आपली भूमिका स्पष्ट करत नसल्याने आघाडी आणि भाजपचा (bjp) जीव टांगणीला लागला आहे. राज्यसभेच्या सहाव्या उमेदवाराचे भवितव्य छोटे पक्ष आणि अपक्षांच्या हाती असल्याने सत्ताधारी आघाडी आणि भाजपकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत.

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi )आणि भाजपमध्ये (bjp) जोरदार संघर्ष आहे. या निवडणुकीचा निकाल अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांवर अवलंबून आहे. बहुजन विकास आघाडीचे (Bahujan Vikas Aghadi) तीन, बच्चू कडू यांची संघटना, एमआयएम आणि समाजवादी यांचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. हे आमदार कोणाच्या पारड्यात मते टाकतात, याबाबत उत्सुकता आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीने मदत मागावी -ओवेसी

दरम्यान, महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्याने अद्याप आमच्याशी संपर्क साधलेला नाही. आम्ही दोन दिवस वाट पाहून आमचा निर्णय घेऊ, असे एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असाउद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी स्पष्ट केले. भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने मदत मागावी. पण महाविकास आघाडीतर्फे कोणीही माझ्यासोबत किंवा आमच्या आमदारासोबत संपर्क साधलेला नाही. त्यामुळे आम्ही वाट पाहू. जर महाविकास आघाडीला आमची गरज असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. गरज नसेल तर ठीक आहे, आम्ही आमचा निर्णय घेऊ. आम्ही आमच्या आमदारांशी चर्चा करत आहोत. निवडणुकीत काय करायचे याचा निर्णय एक किंवा दोन दिवसांत घेऊ, असेही ओवैसी म्हणाले.

- Advertisement -

गिरीष महाजनांनी घेतली हितेंद्र ठाकूर यांची भेट

हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडे तीन मते आहेत. ही मते मिळविण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने प्रयत्न चालविले आहेत. भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी भेट घेतल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जाणारे गिरीष महाजन यांनी सोमवारी रात्री हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन मनधरणी केली. मात्र ठाकूर यांनी अद्याप आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. महाजन यांच्या भेटीआधी खासदार राजन विचारे,  संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनीही ठाकूर यांची भेट घेतली होती. संजय राऊत आणि हितेंद्र ठाकूर यांचे मैत्रीचे संबंध सर्वश्रुत आहेत. पण ठाकूर ऐनवेळी आपली भूमिका जाहीर करणार आहेत. दरम्यान महाजन यांची भेट भाजप उमेदवारासाठी मते मागण्यासाठी होती. निवडणुकीत सर्वजण मते मागत असतात. त्यामुळे या भेटीत काही गैर नाही. आम्ही आमचा निर्णय पक्षात चर्चा करून घेऊ, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

मनसे अजूनही गप्प

प्रमोद उर्फ राजू पाटील हे मनसेचे एकमेव विधानसभा सदस्य  आहेत. पक्षप्रमुख  राज ठाकरे जो आदेश देतील, तो आपण पाळणार असे त्यांनी आधीच जाहीर केले आहे. मात्र निवडणूक जवळ आली तरी मनसेने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. दरम्यान, डहाणूचे माकपचे आमदार विनोद निकोले यांनी राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला पाठींबा जाहीर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -