घरमहाराष्ट्रस्मिता ठाकरेनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, सर्वांच्या भुवया उंचावल्या

स्मिता ठाकरेनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, सर्वांच्या भुवया उंचावल्या

Subscribe

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिवसेनेतील संघर्ष सर्वोच्च न्यायालय तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दरवाजापर्यंत पोहोचला आहे. अशा वेळी स्मिता ठाकरे यांनी शिंदे यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

जूनमध्ये विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आणि राज्यात अल्पमतातील ठाकरे सरकार कोसळले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ५५ पैकी तब्बल ४० आमदारांनी बंड पुकारल्याने खऱी शिवसेना कोणाची असा वाद निर्माण झाला आहे. याच अनुषंगाने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी या बंडखोरांवर कडाडून टीका केली आहे. सामनाचे कार्यकारी संपादक व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

- Advertisement -

ठाकरे आणि शिवसेना हे नाते तोडून दाखवा, हे माझे त्यांना आव्हान आहे. मात्र ते करताना माझे वडील बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून मते मागू नका. प्रत्येकाला आई-वडील असतात. मला माझ्या आई-वडिलांबद्दल आदर आहे. तसा प्रत्येकाला प्रत्येकाच्या आई-वडिलांबद्दल आदर असला पाहिजे. मी माझ्या वडिलांना आणि आजोबांना गुरू मानतो, असे त्यांनी शिंदे गटाला सुनावले होते. याच पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. गेल्या अडीच वर्षांपासून त्या प्रसार माध्यमांपासून दूरच होत्या. पण आज अचानक शिंदे यांना भेटण्यासाठी त्या सह्याद्री अतिथीगृहात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

एकनाथ शिंदे यांचे कार्य मी पाहिले आहे. ते आता मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले असल्याने त्यांना शुभेच्छा द्यायला मी आले असल्याचे स्मिता ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -