तुम्ही वारसदार मग आम्ही कोण? स्मिता ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत उद्धव ठाकरे यांच्यावर मार्मिक टीका केली.

एकनाथ शिंदे( Cm Eknath Shinde)  हे महाराष्ट्राचे लाडके मुंख्यमंत्री आहेत ते काळ, वेळ ,झोप,  पाहत नाहीत फक्त काम त्यांच्या डोक्यात असत. आम्हांला असाच मुख्यमंत्री हवा होता , नुसतं वारसदार, वारस, दार करून चालत नाही. तुम्ही वारसदार मग आम्ही कोण? असा उपहासात्मक टोला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांनी (Smita Thackeray) शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत उद्धव ठाकरे यांच्यावर मार्मिक टीका केली.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच शहीद जवानांच्या पत्नींचाही यावेळी सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना स्मिता ठाकरे यांनी राजकारणावर भाष्य केलं. त्या म्हणाल्या

“एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहेत. ते सतत काम करत असतात, झोप, त्यांच्या डोक्यात फक्त काम असतं. ते तीन तासच झोपतात. त्यांचा दिवस लवकर सुरू होतो आणि उशिरा संपतो. यामुळे ते सर्वांचे लाडके मुख्यमंत्री झालेत.

शिंदे एवढे उपक्रम हाती घेतात, महिलांसाठी बाल विकासासाठी काम करतात. ही काय खायची गोष्ट नाही त्याला फक्त आवड लागते. एकनाथ शिंदेंना आम्ही खूप वर्षांपासून ओळखतो. ते साहेबांचे शिलेदार म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आज बारा बाय बाराच्या खोलीतून वर्षावरचा जो प्रवास आहे, तो काही साधा नाही. त्यामागे काही खडतर प्रयत्न आहे, त्यामुळे ते आज या खुर्चीवर आहेत. आम्हाला असाच मुख्यमंत्री हवा होता. नुसतं वारसदार, वारसदार करुन चालत नाही. तुम्ही वारसदार मग आम्ही कोण? असा टोला स्मिता ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचा नावाचा उल्लेख न करता लगावला.

तसेच यावेळी शिंदे साहेब तळागाळातून काम करत. मी अगदी जवळून पाहिलंय साहेबांना कुठलंही काम असेल तर एकनाथ शिंदेंकडे जायला सांगायचे. असेही यावेळी स्मिता ठाकरे यांनी सांगितले.