घरताज्या घडामोडीस्मिता ठाकरेंनी वर्षा निवासस्थानी घेतले गणरायाचे दर्शन, बंड केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची दुसऱ्यांदा भेट

स्मिता ठाकरेंनी वर्षा निवासस्थानी घेतले गणरायाचे दर्शन, बंड केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची दुसऱ्यांदा भेट

Subscribe

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी येऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली शिंदे उपस्थित होत्या. स्मिता ठाकरेंनी बंड केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे.

- Advertisement -

शिवसेनेतील संघर्ष सर्वोच्च न्यायालय तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दरवाजापर्यंत पोहोचला आहे. अशा वेळी स्मिता ठाकरे यांनी शिंदे यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

गेली अडीच वर्षांपासून प्रसार माध्यमांपासून दूर असलेल्या स्मिता ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांना पूर्वीपासून ओळखते. त्यांचे कार्य मी पाहिले आहे. ते आता मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले असल्याने त्यांना शुभेच्छा द्यायला मी आले असल्याचे स्मिता ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते.

- Advertisement -

जूनमध्ये विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आणि राज्यात अल्पमतातील ठाकरे सरकार कोसळले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ५५ पैकी तब्बल ४० आमदारांनी बंड पुकारल्याने खऱी शिवसेना कोणाची असा वाद निर्माण झाला आहे.


हेही वाचा : मध्यमवर्गीयच रेल्वेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, जितेंद्र आव्हाडांचा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -