Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Video: बापरे! झोपलेल्या चिमुकलीच्या गळ्याला नागाने घातला वेटोळा अन्...

Video: बापरे! झोपलेल्या चिमुकलीच्या गळ्याला नागाने घातला वेटोळा अन्…

Related Story

- Advertisement -

वर्धामधील नागाचा एक थरारक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. जो पाहून सर्वजण हैराण होत आहेत. तब्बल दीड तास नाग एका चिमुकल्याचा गळ्याला वेटोळा घालून बसल्याचे दिसत आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना वर्धाच्या सेलू तालुक्यातील बोरखेडी कलामध्ये घडली आहे. या चिमुकलीच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात असून तिच्यावर सध्या सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नक्की काय घडले?

या थरारक व्हिडिओमधील चिमुकलीचे नाव पूर्वा पद्माकर गडकरी असून ती अवघ्या सात वर्षांची आहे. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे आपल्या आईसोबत पूर्वा झोपली होती. याच मध्यरात्री नाग तिच्या मानेला वेटोळा घालून फणा काढून बसला होता. त्यावेळेस तिचा आईला नागाचा आवाज ऐकून आला. म्हणून त्यावेळेस उठून पाहिलं तर मुलीच्या गळ्याभोवती नाग वेटोळा घालून बसला होता. हे भयानक दृश्य पाहून आईला काय करावं हे सुचेनास झालं. तिने लगेचचं सर्वांना उठवलं. तिच्या समोर दिसणाऱ्या दृश्यावर विश्वास बसत नव्हता. नागाच्या वेटोळ्यात मुलीची सुटका कशी करायची? हा प्रश्न निर्माण झाला होता. पूर्वाला आईने हालचाल करू नको, असे सांगितलं.

- Advertisement -

त्यानंतर अर्धा तास लोटून गेला, घरच्यांनी शेजाऱ्यांना बोलावलं. मग काहींना हा प्रकार मोबाईलमध्ये शूट केला तर काहींना सर्पमित्रांना फोन लावला. मात्र मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे एकही सर्प मित्र उपलब्ध झाला नाही. नागाच्या वेटोळ्यात तब्बल दीड राहिल्यानंतर पूर्वाचा धीर सुटायला लागला होता. सात वर्षीय पूर्वाच्या हाताची नकळत हालचाल झाली आणि चवताळेल्या नागाने पूर्वाला दंश केला. यावेळेस रात्रीचे दोन वाजले होते. पूर्वाला तातडीने उपचार करण्याची गरज होती. तिच्या कुटुंबियांनी तिला सेवाग्रामच्या रुग्णालयात दाखल केले आणि त्या ठिकाणी तिच्यावर तातडीने उपचार सुरू झाले.

सेवग्राम रुग्णालयातील डॉ. विशाल कांबळे म्हणाले की, सर्प दंशाचा जो साईड इफेक्ट असतो तो नियंत्रित केला आहे. सर्प दंशाच्या जागी जी सूज आली आहे ती वाढत असून हाताचा रंग बदलत आहे. यासाठी पुढील उपचारासाठी सर्जरीच्या डॉक्टरांशी संपर्क साधला जाणार आहे. पूर्वाची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. पुढील तीन ते चार दिवस डॉक्टरांचे तिच्यावर लक्ष असणार आहे.

- Advertisement -

 

Posted by Pravin K Bose on Sunday, September 12, 2021

 


हेही वाचा – Viral Video: अंतराळात रंगली पिझ्झा पार्टी


 

- Advertisement -