घर महाराष्ट्र ...म्हणून मुख्यमंत्री होण्याच्या दादांच्या स्वप्नावर पाणी पडत आहे, राष्ट्रवादीने स्पष्ट केली भूमिका

…म्हणून मुख्यमंत्री होण्याच्या दादांच्या स्वप्नावर पाणी पडत आहे, राष्ट्रवादीने स्पष्ट केली भूमिका

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट नाहीच, असे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार वारंवार सांगत आहेत. त्यावरून राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहेत. यामुळे संभ्रम निर्माण होत असल्याचेही चित्र आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसने यामागची भूमिका स्पष्ट करत, मुख्यमंत्री होण्याच्या अजित पवार यांच्या स्वप्नावर पाणी का पडत आहे, याचे कारण विषद केले आहे.

हेही वाचा – अभी तो सूरज उगा है…, कविता वाचन करत पंतप्रधान मोदींकडून मिशन चांद्रयान-3चे कौतुक

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फुट पडलेली नाही. आमच्यापैकी काही लोकांनी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या निर्णयाबद्दल आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. यावर लवकरच निकाल येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अलीकडे म्हटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही त्याला दुजोरा दिला होता. आमच्यापासून काही आमदार वेगळे झाले ही वस्तुस्थिती आहे, मात्र त्यांनी फक्त पक्षाच्या विचारसरणीहून वेगळी भूमिका घेतली, असे म्हणता येईल. ते आमदार काही पक्षातून फुटून गेले नाहीत, असे शरद पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

तरीही राजकीय वर्तुळात नानाविध तर्कवितर्क लढविले जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार वाचविण्यासाठी केंद्र सरकारने उच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाला हाताशी धरून, सर्व संकेत आणि नियमांना हरताळ फासत, शिवसेना पक्ष कायदेशीर दृष्ट्या फोडला. त्याचे चिन्ह आणि नाव शिंदे गटाला बहाल करण्यात आले. या सर्व घडामोडी लक्षात घेता, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलाच नाही”, ही भूमिका घेणे ही आमच्या पक्षाची राजकीय गरज आणि मुत्सद्दीपणा देखील आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे सहराज्य प्रमुख मोहसीन यांनी म्हटले आहे. राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे हे ट्वीट रीट्वीट केले आहे.

आज जर राष्ट्रवादी काँग्रेस न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे गेला तर काय होणार? हे वेगळे सांगायची गरज नाही. पण पक्ष फुटलाच नाही, या एका खेळीमुळे पक्ष सोडलेल्या सर्व आमदारांची, अजितदादांची आणि भाजपाची गोची झाली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी याचा अधिक खुलासा करताना सांगितले की, पक्ष फुटलाचं नाही असे म्हटल्याने सध्या राष्ट्रवादीच्या काही आमदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यामुळे अनेक आमदार सावध भूमिका घेत आहेत, यामुळे अजितदादा यांच्या गटाला त्यांच्याकडे नेमके किती आमदार आहेत, हे भाजपला सांगता येत नाही.

हेही वाचा – यंदा परभणीत सरासरी पावसाच्या तुलनेत 43 टक्केच पाऊस; अजित पवारांची माहिती

अजित पवार गटातील आमदारांची संख्या कळत नसल्याने भाजपा आता त्या गटाकडे दुर्लक्ष करत आहे. शिंदे गटाकडे अजूनही 45हून अधिक आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे त्यांची जागा आत्तातरी कोणी घेऊ शकत नाही. शिवाय, निवडणूक आयोगाला देखील यात हस्तक्षेप करण्यास काही वाव राहत नाही आणि न्यायालयाला हाताशी धरून काही करावे म्हटले तर, पक्षाच्या या भूमिकेमुळे केंद्राचे देखील हात बांधले गेलेत, असे मोहसीन यांनी म्हटले आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला याची कल्पना दिली जात असल्याने त्यांचा पूर्ण पाठिंबा शरद पवार यांना असल्याचे सांगत, न्यायालय आणि निवडणूक आयोगाला हातचे खेळणे बनवून शिवेनेसोबत केंद्र सरकारने जे केले, तेच राष्ट्रवादीसोबत करण्याचा प्रयत्न आहे. परंतु शरद पवार यांच्या या भूमिकेने त्यांची देखील गोची झाली आहे… यासोबतच अजितदादांचे मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नावर देखील पाणी पडत आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.

- Advertisment -