मुंबई : सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्ष महाविकास आघाडी यांच्यातील निकराच्या राजकीय लढाईत कोण बाजी मारणार याचा फैसला आज, शनिवारी (23 नोव्हेंबर) होणार आहे. राज्यातील 288 मतमोजणी केंद्रांवर एकाचवेळी मतांची मोजणी सुरू होईल. मात्र तुम्हाला माहिती आहे का? आतापर्यंत किती अपक्षांनी प्रत्येक निवडणुकीत यश मिळवत इतर नेत्यांना धक्का दिला आहे. (So far independents have managed to attract at least 8 to 24 percent of the votes in every election)
यंदा विधानसभा निवडणुकीत 158 राजकीय पक्षांचा समावेश असून 4 हजार 136 उमेदवारांनी केले होते. त्यात सर्वाधिक अर्ज हे अपक्ष उमेदवारांनी भरले असून हा आकडा 2 हजार 806 इतका होता. मात्र उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर आता फक्त 33 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, राज्यात झालेल्या एकूणच मदानानंतर कोणत्याही एका पक्षाला सहज एकहातील सत्ता मिळेल अशी सध्या तरी परिस्थिती नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेचा 145 चा जादुई आकडा गाठण्यासाठी अपक्षांची मदत लागणार आहे. याचपार्श्वभूमीवर निकाल लागाच्या आधीच राज्यातील राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी त्यांचा मोर्चा निवडून येण्याची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवारांकडे वळवला आहे. कारण आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये अपक्षांनी प्रत्येक निवडणुकीत यश ओढले आहे.
मागील निवडणुकांवर नजर टाकली तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये अपक्षांनी प्रत्येक निवडणुकीत किमान 8 ते 24 टक्क्यांपर्यंत मते ओढण्यात यश मिळविले आहे. 1995 मध्ये भाजपाला 32.16 टक्के, काँग्रेसला 31.23 टक्के तर शिवसेनेला 27.7 टक्के मते मिळाली होती. विशेष म्हणजे त्याखालोखाल अपक्षांना मिळालेल्या मतांचा आकडा 23.63 टक्के होता. प्रत्येक निवडणुकीत अपक्षांच्या मतांमुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या मतांवर मोठा परिणाम होत असल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे.
हेही वाचा – Maharashtra Election 2024 Result : महायुती-मविआचा आज फैसला; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आतापर्यंत अपक्षांना मिळालेली मते
1962 मध्ये 16.74 टक्के
1967 मध्ये 14.57 टक्के
1972 मध्ये 12.68 टक्के
1978 मध्ये 14.06 टक्के
1980 मध्ये 8.03 टक्के
1685 मध्ये 17.49 टक्के
1990 मध्ये 13.59 टक्के
1995 मध्ये 23.63 टक्के
1999 मध्ये 9.49 टक्के
2004 मध्ये 14.05 टक्के
2009 मध्ये 15.51 टक्के
2014 मध्ये 4.71 टक्के
2019 मध्ये 7.93 टक्के
आजवर सर्वाधिक जिंकलेले अपक्ष आमदार
किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर विधानसभेतून 2019 साली 72,661 मतांनी विजय मिळवला होता. यानंतर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचा नंबर लागतो. त्यांनी 1999 साली वसईमधून 50,428 आणि 2004 साली पुन्हा वसईमधून 67,917 विजय मिळवला होता. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर के. पी. पाटील यांनी 2004 साली राधानगरी येथून 55,340 मतांनी विजय मिळवला होता. चौथ्या क्रमाकावर पप्पू कलानी यांचा नंबर लागतो. त्यांनी उल्हासनगर येथून 1995 साली 55,334 मतांनी विजय मिळवला होता. पाचव्या क्रमाकांवर शिवचंद चुडीवाल यांनी आर्वी मतदारसंघातून 1978 साली 52,278 मतांनी जिंकले होते. सहाव्या क्रमांकावर प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी येथून 2019 साली 49,810, सातव्या क्रमांकावर सतेज पाटील यांनी 2004 साली करवीर मतदारसंघातून 42,604, रामराजे नाईक निंबाळकर यांनी 1995 साली फलटण येथून 42,449 आणि साहेबराव दरेकर यांनी आष्टी मतदारसंघातून 1995 साली 41,479 मतांनी विजय मिळवला होता.
हेही वाचा – Maharashtra Election 2024 : पाठिंबा हवा असेल तर…; जानकरांनी ठेवल्या या अटी
सर्वात कमी मतांनी जिंकलेले अपक्ष आमदार
संजय देशमुख हे सर्वात कमी मतांनी जिंकलेल्या आमदारांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 1999 साली दिग्रस मतदारसंघातून फक्त 126 मतांनी विजय मिळवला होता. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कन्हैयालाल नहार यांचा नंबर लागतो. त्यांनी 1978 साली नांदगाव मतदारसंघातून 243 मतांनी विजय मिळवता होता. तिसऱ्या क्रमांकावर बाजीराम जगताप यांनी माजलगाव मतदारसंघातून 1995 साली 388, सीताराम घनदाट यांनी 1995 साली गंगाखेड मतदारसंघातून 476, संपतराव जेधे यांनी भोर मतदारसंघतून 1978 साली 498, मोहनराव गुदगे यांनी खटाव मतदारसंघातून 1995 साली 595, दिगंबरराव बागल यांनी करमाळा मतदारसंघातून 1999 साली 681, वामन भोकरे यांनी अचलपूर मतदारसंघातून 1978 साली 732, गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्व मतदारसंघातून 2014 साली 745 आणि विठ्ठलराव पाटील यांनी चंदगड मतदारसंघातून 1978 साली 807 मतांनी विजय मिळवला होता.