घरमहाराष्ट्र...म्हणून मी पत्रकारांबाबत असा सल्ला दिला; व्हायरल ऑडिओ क्लिपवर बावनकुळेंचं स्पष्टीकरण

…म्हणून मी पत्रकारांबाबत असा सल्ला दिला; व्हायरल ऑडिओ क्लिपवर बावनकुळेंचं स्पष्टीकरण

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात खूप चांगलं कालं केलं आहे. तरीदेखील खूप निगेटिव्ह बातम्या येत असतात. पत्रकारांना चहा प्यायला बोलवा किंवा तुम्ही त्यांच्याकडे चहा प्यायला जा आणि त्यांना खरी वस्तुस्थिती सांगा.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्राकारांबाबत पदाधिकाऱ्यांना दिलेल्या सल्ल्याची एक ऑडिओ क्लिप खूप व्हायरल झाली. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर विरोधाकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. घडलेल्या या संपूर्ण प्रकारानंतर बावनकुळे यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. (So I gave this advice to journalists Chandrashekhar Bawankule the viral audio clip)

काय म्हणाले होते बावनकुळे?

बावनकुळे यावेळी म्हणाले की, ज्या बुथवर तुम्ही काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिक्स मीडियावाले कोण आहेत, पोर्टलवाले कोण आहेत हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतोय, पण हे असं काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत त्यांची यादी तयार करा. यात एक, दोन, पोर्टलवाले कोण आहेत हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतोय, पण हे असे काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत त्यांची यादी तयार करा. यात एक, दोन पोर्टलवाले, प्रिंट आणि इलेक्टॉनिकवाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला. त्यात काही कमी जास्त झाले तर सुजय विखे आहेतच असं त्यांनी म्हटलं.

- Advertisement -

बावनकुळे यांचं स्पष्टीकरण

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आपण एवढं चांगलं काम करतो, म्हणून मी असचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात खूप चांगलं कालं केलं आहे. तरीदेखील खूप निगेटिव्ह बातम्या येत असतात. पत्रकारांना चहा प्यायला बोलवा किंवा तुम्ही त्यांच्याकडे चहा प्यायला जा आणि त्यांना खरी वस्तुस्थिती सांगा.

कारण, शेवटी समाजात पत्रकारांना मोठं स्थान आहे. पत्रकार आपल्या न्यायवस्थेतील चौथा स्तंभ आहे. पत्रकारांना सन्मान देऊन त्यांच्यासोबत चांगलं वागा,या अर्थानं मी ते विधान केलं आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाईट हेतू नव्हता.

- Advertisement -

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली, यावेळी त्यांनी बाजप सरकारवर टीकास्त्र डागलं.

12 पत्रकार विकले गेले म्हणून…

विजय वडेट्टीवार म्हणाले की, तुम्ही राज्यातील पत्रकारांना काय चिरमिरी घेणार समजताय का? देशातील 12 पत्रकार विकले गेले म्हणून सगळे पत्रकार स्वत:चा इमान विकतील असं नाही.

दुसऱ्यांचे पक्ष फोडून, ईडी सीबीआयसारख्या संस्थांचा धाक दाखवून ही भाजप विरुद्ध आवाज दबत नाहीये. त्यामुळे दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत तुमच्या पक्षातील सर्व नेत्यांची आणि अंधभक्तांची वाढलेली अस्वस्थता आम्ही समजू शकतो.

पण त्यामुळे तुम्ही थेट पत्रकारांना चिरीमिरी द्यायला निघाले? तुमची आजची अवस्था पाहून आगामी निवडणुकीत तुम्ही मतांसाठी जनतेलासुद्धा चिरीमीरी यचा प्रयत्न करणार हे नक्की.. पण जनता 2024 मध्ये भाजपची चिंधी उधळल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -