घरमहाराष्ट्र...म्हणून मी गाढव पाळतो, गुणरत्न सदावर्तेंनी सांगितलं 'कारण'

…म्हणून मी गाढव पाळतो, गुणरत्न सदावर्तेंनी सांगितलं ‘कारण’

Subscribe

पोटातले आजार त्या दुधामुळे समूळ नष्ट होतात. उच्चभ्रू कुटुंबामध्ये वेगवेगळ्या मशीन आणल्या जातात. परंतु बालकांना पोटातल्या आजारांसाठी गाढवाचं दूध मिळत नाही. म्हणून ते गाढव आमची मुलगी झेन सदावर्ते आहे, तिच्या लाडाखातर माळेगावच्या यात्रेतून घेतलं होतं. त्यात ते लोकोपयोगी आहे आणि आम्ही प्राणी प्रेमी आहोत, असंही ते म्हणालेत.

मुंबईः गेल्या काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी गाढव पाळल्यानं त्याची खूपच चर्चा झाली होती. या गाढवासोबतचे गुणरत्न सदावर्ते आणि कुटुंबीयांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर केलेल्या हल्ल्यामुळे मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करून त्यांची सुटकाही झाली. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी बीबीसी मराठीला एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी गाढव पाळण्यासंदर्भात खुलासा केलाय.

आम्ही ते गाढव आमची मुलगी झेन सदावर्ते आहे, तिच्या लाडासाठी माळेगाव यात्रेतून घेतलं होतं, असंही गुणरत्न सदावर्तेंनी सांगितलंय. मी सांगतो तुम्हाला, मी आधीच सांगितलं आहे की, मी योग अभ्यासक आहे. तुम्हाला माहीत आहे का? त्याच्या दुधाचे काय काय चांगले परिणाम आहेत. पोटातले आजार त्या दुधामुळे समूळ नष्ट होतात. उच्चभ्रू कुटुंबामध्ये वेगवेगळ्या मशीन आणल्या जातात. परंतु बालकांना पोटातल्या आजारांसाठी गाढवाचं दूध मिळत नाही. म्हणून ते गाढव आमची मुलगी झेन सदावर्ते आहे, तिच्या लाडाखातर माळेगावच्या यात्रेतून घेतलं होतं. त्यात ते लोकोपयोगी आहे आणि आम्ही प्राणी प्रेमी आहोत, असंही ते म्हणालेत.

- Advertisement -

माझ्या वडिलांच्या काळात डझनांहून अधिक प्राणी आमच्या घरात होते. मृत्यूनंतरही समाजाच्या उपयोगी आले पाहिजे. माझे वडील लोकप्रतिनिधी होते, त्यांनी मरणोपरांत मेडिकल कॉलेजला स्वतःचं देहदान केलं. त्यामुळे आम्ही अशा वृत्तीची माणसं आहोत. हे सगळ अर्धज्ञानातून लोक बोलत असतात. मी गाढवाच्या लग्नाऐवजी त्याच्या दुधाचे खरे परिणाम आणि औषधयुक्त दूध असतं हे सांगितल्यानंतर टीका करणाऱ्यांना मला असं वाटतं हे टॉनिक आहे, असा टोलाही त्यांनी टीकाकारांना लगावलाय.

गेल्या काही दिवसांपूर्वी गाढवासोबतचे गुणरत्न सदावर्ते आणि कुटुंबीयांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे सदावर्तेंवर पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी निशाणा साधला होता. गुणरत्न सदावर्ते यांचा पाळीव गाढव असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या या गाढवाचं नाव मॅक्स असून, गुणरत्न यांची लेक झेनचा या मॅक्स गाढवासोबतचा फोटो व्हायरल होत आहे.

- Advertisement -

तसेच सदावर्तेंची पत्नी जयश्री पाटील आणि मुलगी झेनचे गाढवासोबत फोटो देखील तुफान व्हायरल होतायत. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाहबाबत हायकोर्टाने निकाल जाहीर केल्यानंतर या गाढवाला म्हणजे मॅक्सला पेढे भरवण्यात आल्याचे समोर आले होते. तसेच त्याचे देखील व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सदावर्तेंच्या प्रत्येक आनंदात या मॅक्सला सहभागी केले जाते. जयश्री सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या फेसबुक अकाऊंटवर या मॅक्स गाढवाचे फोटो शेअर केले आहेत.


हेही वाचाः गुणरत्न सदावर्तेंनी घरात पाळलाय चक्क गाढव, नाव ठेवलंय ‘मॅक्स’; गाढवामुळे चर्चांना उधाण

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -