घरमहाराष्ट्र…तर भारताचे दोन तुकडे झाले असते; डॉ. आंबेडकरांचा उल्लेख करताना वडेट्टीवार असं...

…तर भारताचे दोन तुकडे झाले असते; डॉ. आंबेडकरांचा उल्लेख करताना वडेट्टीवार असं का म्हणाले?

Subscribe

परभणी : राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत मोठं विधान केलं आहे. डॉ. आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर भारताचे दोन तुकडे झाले असते, असं मत त्यांनी मांडलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. (So India would have been divided into two parts Vijay Wadettiwar Dr babasaheb ambedkar Maharashtra Politics COngress Chhagan Bhujbal)

हेही वाचा – Maharashtra Politics : भुजबळांमागे अदृष्य हात, विजय वडेट्टीवारांचा कोणाकडे इशारा?

- Advertisement -

परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी (19 नोव्हेंबर) आश्रय सेवाभावी संस्था व गगन मलिक फाउंडेशनच्यावतीने थायलंड येथील पंचधातूच्या सहा फूट उंचीच्या 50 बुद्धरूप मूर्तींचे वितरण आणि वैश्विक धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला विजय वडेट्टीवार, थायलंड येथील भिक्खू गगन मलिक यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध समाज बांधवांची उपस्थिती होती. यावेळी मूर्ती वितरण झाल्यानंतर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. याचवेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्विकारलेल्या बौध्द धर्मावर वक्तव्य केलं.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता, तर आज देशाचे दोन तुकडे करावे लागले असते. आजवर दिल्लीत बसलेल्या लोकांनी हा विचार केला पाहिजे. परंतु सध्या दिल्लीत गोपीचंद, फेकुचंद, तोरडमल हे लोक बसले आहेत. या लोकांचा विचार देश तोडणारा आहे, असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला. यावेळी त्यांनी मंदिरातील पुजाऱ्यांनाही लक्ष केले. मंदिरातील दान पेट्या काढून घेतल्यास, मंदिरात असलेले पुजारी पळून जातील आणि मंदिराची देखरेखही करणार नाहीत, असे वडेट्टीवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – शिवसेनेची मशाल घेऊन महाराष्ट्रभर फिरत आहे, फोटो शेअर करत अंधारेंनी भुजबळांना करून दिली आठवण

भुजबळांच्या मागे अदृष्य हात असेल तर…

दरम्यान, मनोज जरांगे यांच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी छगन भुजबळांवर भाजपाचा दबाव असल्याचा आरोप होत आहे. यावर भाष्य कतराना विजय वडेट्टीवार म्हणाले की, अशी चर्चा मीदेखील ऐकली आहे. परंतु मी विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळे कोणावरही आरोप करण्यापूर्वी मला त्यासंदर्भात थोडी अधिक माहिती घेऊ द्या, त्यानंतर मी यावर नक्की बोलेन. मला वाटलं की यामागे कोणाचे तरी अदृष्य हात आहेत तर, मग मी त्याचा पडदा टराटरा फाडल्याशिवाय रहणार नाही, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

वडेट्टीवारांनी दिलं स्पष्टीकरण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर वक्तव्य केल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, जर बौद्धांच्या मार्गावर चाललो तर आपला देश किंवा जग शांतीच्या मार्गावर चालेल. बाबासाहेबांनी धर्मातर करत असताना स्पष्टपणे बौद्ध धर्माचा स्विकार केला. परंतु त्यावेळेस अनेकांनी बाबासाहेबांना आग्रह केला होता, ती भूमिका त्यावेळेस बाबासाहेबांनी घेतली असती तर आजचे रार्जेकर्ते दिल्लीत बसून विष पेरत आहेत आणि दोन धर्मामध्ये आग लावण्याचं काम करत आहेत. त्यामुळे या देशाचे दोन तुकडे झाले आहे, असं स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी दिलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -