…तेव्हा अनेक आमदार मातोश्रीवर येऊन डोकं टेकवतील, चंद्रकांत खैरेंचा दावा

तसेच, त्यांनी इम्तियाज जलील यांच्यावरही टीका केली. इम्तियाज जलील (Imtiyaj Jalil) हा अत्यंत नाटकी माणूस आहे, तो हिंदू-मुस्लिम वाद लावण्यासाठी नाटकं करतो, असंही चंद्रकांत खैरे म्हणाले.

Chandrakant Khaire

शिवसेनेसोबत बंडखोरी केलेले आमदार पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वाकडे परततील असा दावा अनेकांकडून केला जातोय. त्याप्रमाणे, मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर अनेक आमदार मातोश्रीवर येऊन डोकं टेकवतील, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तसेच, त्यांनी इम्तियाज जलील यांच्यावरही टीका केली. इम्तियाज जलील (Imtiyaj Jalil) हा अत्यंत नाटकी माणूस आहे, तो हिंदू-मुस्लिम वाद लावण्यासाठी नाटकं करतो, असंही चंद्रकांत खैरे म्हणाले. (… So many MLAs will come to Matoshri and bow their heads, claims Chandrakant Khaire)

हेही वाचा – मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला सुस्साट वेग; शिंदे-फडणवीस सरकारने दिली मंजुरी

चंद्रकांत खैरे म्हणाले की, सध्या सुरू असलेलं शक्ति प्रदर्शन खोटं आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांमध्ये वाद होणार आहेत. येणाऱ्या काळात त्यांना कळेल की इथे दिल्लीचा कंट्रोल आहे. तसंच, एनडीए सरकार आल्यापासून कोणाचीच कामं होत नाहीत, असंही चंद्रकांत खैरे म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून बंडखोर आमदार शिवसेनेत परततील असा दावा अनेकांकडून केला जातोय. मानापानाच्या मुद्द्यावरून सेना-भाजप युती रखडल्याचंही दीपक केसरकरांनी सांगितलं. त्यामुळे सेना आणि भाजप युती होणार का याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. तसंच, बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरे परत घेणार की शिंदे गटाविरोधात कारवाई करणार हे पहावं लागणार आहे.